Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक

रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

157
Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक
Modern Bus Stand: आळंदी, देहू, पंढरपुरात अत्याधुनिक बस स्थानकं, अजित पवारांनी घेतली आढावा बैठक

राज्यातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी दिवसेंदिवस भाविकांची गर्दी वाढत आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र परिसरात निर्माण होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी तीर्थक्षेत्र आळंदी, देहू आणि पंढरपूर परिसरात अत्याधुनिक बसस्थानक (Modern Bus Stand) बांधून त्याच्यावर रॅम्पची सुविधा असलेले वाहनतळ उभारण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.

मुंबईत खेड-आळंदी मतदारसंघातील विविध विकासकामांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढावा बैठक घेतली.
यावेळी ते म्हणाले की, तीर्थक्षेत्र आळंदी येथे आषाढी वारीसह वर्षभर मोठ्या प्रमाणात भाविक येतात. आलेल्या भाविकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये, यासाठी पुरेशा वाहनतळाची व्यवस्था उपलब्ध असणे आवश्यक आहे. एसटी बसस्थानकांच्या इमारतीवर रॅम्पच्या सुविधेसह पार्किंग उभारण्याचा प्रस्ताव तयार करावा, या आराखड्यात इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंग सुविधेचाही समावेश करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्र्यांनी दिल्या.

(हेही वाचा – China : चीनमध्ये नवा आजार, केंद्र सरकारकडून खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात)

बसस्थानक परिसरातील रस्त्यांसाठी एसटी महामंडळाची ६५२ चौरस मीटर जागा प्रस्तावित आहे. त्यासाठी एसटीला जागेच्या मोबदल्याची रक्कम जिल्हा नियोजन समितीमधून देऊन जागा नगरपालिकेला हस्तांतरित करावी, असेही ते म्हणाले. यावेळी चाकण शहरातील विकासकामांचा आढावाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.