State Reserve Police Force : राज्य राखीव पोलीस दलात कसे सामील व्हावे, जाणून घ्या…

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख १५ फेब्रुवारी २०२४ आहे.

610
PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या
PUNE शहर पोलीस दलातील २१ अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे बदली झाली? जाणून घ्या

राज्य राखीव पोलीस दलाच्या (State Reserve Police Force) भरती प्रक्रियेची माहिती अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असते. यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अनुभव, अर्जाची अंतिम तारीख याचा सविस्तर तपशील नोटिफिकेशन येथे देण्यात आला आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन माध्यमातून अर्ज मागवण्यात येतात. या पदभरतीसाठी अपर पोलीस महासंचालक, राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्याकडून पदभरतीविषयी माहिती देण्यात येते.

अधिकृत संकेतस्थळावर संस्थेचे नाव (केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF),जाहिरात क्रमांक, पदाचे नाव, पदांची संख्या, नोकरी ठिकाण, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, वेतन श्रेणी, अर्ज पद्धती, अर्ज फी, अर्ज करण्याची शेवटची तारीख आणि महत्त्वाचे म्हणजे ऑनलाईन अर्ज (Apply Online) यासंदर्भातील विस्तृत माहिती दिली जाते. ज्या पदाकरिता अर्ज करत आहोत, ती जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाईन अर्ज भरता येतो.

१५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत..

राज्य राखीव पोलीस भरती परीक्षेला बसण्यासाठी अर्ज प्रक्रिया करण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी CRPFच्या अधिकृत वेबसाईट rect.crpf.gov.inवर किंवा https://spardhapariksha.com/crpf-constable-gd-recruitment ऑनलाइन अर्ज करू शकतात. गुरुवार, १५ फेब्रुवारीपर्यंत अंतिम मुदत राज्य राखीव पोलीस दलात भरती प्रक्रिया सुरू असून इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

पोलीस भरती झाल्यानंतर प्रशिक्षण कसे दिले जाते –
सकाळी लवकर रनिंग सुरू होते. त्यानंतर कवायत होते. त्यामध्ये वेगवेगळे शारीरिक कवायतीचे प्रकार घेतले जातात तसेच हत्यार ओळख, परेड त्याचप्रमाणे प्रशिक्षण कालावधीमध्ये श्रमदान, खेळ, विशेष कमांडो प्रशिक्षण, कराटे, योगा इत्यादी घेतले जाते.

कायदाविषय क्लास
यामध्ये आयपीसी, सीआरपीसी आणि इतर कायदे, पोलिसांचे अधिकार आणि कर्तव्य, पोलीस-समाज संबंध, प्रत्यक्ष पोलीस स्टेशन भेट इत्यादी शिकवले जाते.

– पोलीस प्रशिक्षण कालावधी ९ महिन्यांचा असतो.
-पोलीस प्रशिक्षणात लेखी, ग्राउंड अशी परीक्षा होते.
– शेवटी पासिंग आऊट परेड होते.

पोलीस भरती झाल्यानंतर …
– महाराष्ट्रात एकून ९ पोलीस प्रशिक्षण केंद्रे आहेत. त्यापैकी ७ पुरुष प्रशिक्षण केंद्रे आणि २ महिला प्रशिक्षण केंद्रे आहेत.

– जालना, मरोळ (मुंबई), भाबळगाव, लातूर, खंडाळा, पुणे (महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र), नागपूर (महिला पोलीस प्रशिक्षण केंद्र ), सोलापूर, अकोला, तासगाव (सांगली), दौड (पुणे) येथे ही प्रशिक्षण केंद्रे आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.