राज्यात गोवरचे रुग्ण तपासण्यासाठी सुरू होणार दोन प्रयोगशाळा

131

राज्यात गोवरमुळे संशयित रुग्णांची संख्या तेरा हजारांच्या पलीकडे गेली असताना गोवरचा उद्रेक नियंत्रणात आणण्यासाठी राज्याकडे स्वतःची अद्यायावत प्रयोगशाळा सुरु केली जावी, असे गोवर आजाराच्या नियंत्रणासाठी स्थापन केलेल्या टास्ट फोर्सकडून सूचवण्यात येणार आहे. मंगळवारी आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांना पुणे आणि नागपूरातील प्रयोगशाळेत गोवर तपासणीच्या यंत्रणा कार्यान्वित केल्या जाव्यात, अशी शिफारस टास्क फोर्सकडून केली जाईल.

( हेही वाचा : वर्षाखेरीस होणार कोरोनाचा अंत? राज्यात बारा जिल्हे कोरोनामुक्त )

सोमवारी गोवर टास्क फोर्सची पहिली बैठक झाली. या बैठकीत राज्याकडे गोवर तपासणीसाठी स्वतःची प्रयोगशाळा असायला हवी, यावर प्राधान्य देण्याबाबत एकमत झाले. टास्क फोर्सचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोवर तपासणीसाठी राज्यातील संशयित रुग्णांचे नमुने गुजरात राज्यातील अहमदाबाद किंवा तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथे पाठवले जात आहेत. त्याऐवजी पुण्यात राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा किंवा नागपूरात वैद्यकीय महाविद्यालयात गोवरच्या केसेस ओळखण्याचे तंत्रज्ञान असलेल्या प्रयोगशाळा सुरु केल्या जाव्यात, जेणेकरुन राज्यात गोवर नियंत्रणाच्या प्राथमिक सुविधा सुरु होतील, असा मुद्दा मांडण्यात आला. पुण्यात राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळा किंवा बीजे वैद्यकीय महाविद्यालय यापैकी कुठेही एका प्रयोगशाळेत तंत्रज्ञान सुरु केले जावे, अशी शिफारस घेतली जाणार आहे. यासह केंद्रांकडून शिफारस केलेल्या सूचनांनुसार कृती आराखडाही तयार करण्याची शिफारस आरोग्य मंत्र्यांना केली जाणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.