माथाडी कामगारांनी बुधवारी राज्यव्यापी संप पुकारला आहे. या संपामुळे नवी मुंबईतील पाचही मार्केट्स बंद आहेत. पहाटे सुरु होणा-या भाजीपाल्याच्या मार्केटमध्येही कडकडीत बंद पुकारण्यात आला आहे. माथाडी कामगारांच्या संपामुळे भाजीपाला तसेच कडधान्याचा आज तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. त्याचसोबत भाजीपाला आणि कडधान्य आज महागण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.
माथाडी कामगार नेते नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांनी मागण्या पूर्ण न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
( हेही वाचा: 2023 चा अर्थसंकल्प बनवण्यासाठी ‘या’ पाच जणांनी केली अर्थमंत्र्यांना मदत )
मागण्या काय?
- माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करुन त्यावर कामगारांचे प्रतिनिधीत्व करणा-या संघटनांच्या प्रतिनिधींची सदस्य म्हणून नेमणूक करावी
- सुरक्षा रक्षक कामगार सल्लागार समितीची पुनर्रचना करावी
- विविध माथाडी मंडळाच्या पुनर्रचना करुन त्यावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात सदस्यांच्या नेमणुका करणे
- विविध माथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणे
- माथाडी कायदा व विविध माथाडी मंडळांच्या योजनेतील त्रुटी दूर करण्यासंबंधी विशेष समिती गठीत करणे
- विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगार व अन्य घटकांसाठी सुविधा उपलब्ध करणे
- माथाडी कामगारांच्या कामात अडथळा आणून कामगारांवर दहशत करणा-या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींना आळा घालण्यासाठी संबंधितांची समिती गठीत करणे
- सिडकोमार्फत माथाडी कामगारांना नवी मुंबई परिसरात तायर घरे मिळणे.