माळरानावरील रहस्यमय प्राणी लांडगा ! लांडग्यांच्या संवर्धनासाठी (wolf conservation) संशोधकांचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या लांडग्यांना स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागत आहे. त्यांचा अधिवास (habitat), त्यांची वसतिस्थाने, त्यांचे वर्तन यावर अभ्यास सुरू आहे.
राज्य वन विभागाने ‘लांडगा संवर्धनाच्या राज्यस्तरीय आराखड्या’ला मान्यता दिली आहे. याविषयी प्रस्ताव केंद्रीय वन्य जीव मंडळाकडे (Central Wildlife Board) पाठवला आहे. मंडळाने परवानगी दिल्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी होणार आहे. पहिल्या टप्प्यात राज्यातील १० जिल्ह्यांमध्ये प्रकल्प राबवण्याचा ग्रासलँड ट्रस्ट (Grassland Trust) आणि ‘अशोका ट्रस्ट फॉर रिसर्च इन इकोलॉजी अँण्ड एन्व्हार्नमेंट’ (Ashoka Trust for Research in Ecology and Environment) या संस्थांचा प्रस्ताव आहे.
यामध्ये दिवेघाटातील माळराने, लांडग्यांचे व्हिडियो चित्रीकरण, नकाशे, छायाचित्रे आणि वसतीस्थानांचे डॉक्युमेंटेशन यावर आधारित लांगड्यांच्या संवर्धनासाठी काम सुरू आहे. ग्रासलँड ट्रस्टचे प्रमुख महिर गोडबोले (Head of Grassland Trust Mahir Godbole) यांनी सांगितले की, लांडग्यांना वाचवण्यासाठी माळरानांना संरक्षण द्यावे लागणार. तेथे होणारा मानवी हस्तक्षेप, चराईसाठी येणाऱ्या गुरांवर नियंत्रणाची गरज आहे. या डॉक्युमेंटेशनच्या कामातही तरुणांना सहभागी केले जाणार आहे. बारामतीतील गावांमध्ये सध्या हे मॉडेल राबवले जात आहे.
(हेही वाचा – India vs Canada : ब्रिटनमध्ये भारतीय उच्चायुक्तांसोबत गैरवर्तन, भारताकडून संताप व्यक्त)
भारतीय लांडग्यांसाठी संवर्धन आराखडा आवश्यक
अभ्यासकांच्या प्राथमिक माहितीनुसार, देशात भारतीय लांडग्यांची संख्या केवळ २ ते ३ हजार आहे. लांडग्यांचा सर्वाधिक महाराष्ट्रात होतो. प्रामुख्याने दख्खनचे पठार, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगरमध्ये लांडगे आढळतात. पुणे जिल्ह्यात ५०पेक्षा अधिक लांडग्यांची नोंद झाली आहे. टायगर प्रोजेक्टप्रमाणेच (Tiger Project ) भारतीय लांडग्यांसाठी संवर्धन आराखडा आवश्यक असल्याची माहिती अभ्यास मिहीर गोडबोले यांनी दिली आहे.
लांडगे धोक्यात का ?
सध्या लांडग्यांना स्वत:चे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावे लागत आहे. याचे कारण माळरानांवरील मानवी हे आहे. याशिवाय पडिक जागा समजून वृक्षारोपण केले जाते, माळरानावर उसाची शेती केली जाते. भटक्या कुत्र्यांचा उपद्रवामुळेही लांडग्यांना त्रास होतो आणि त्यांचे अस्तित्व धोक्यात येते. याशिवाय बिबट्या आणि लांडग्यांच्या संघर्षामुळेही लांडग्यांच्या अस्तित्वाला धोका पोहोचतो.
कसा केला जातो अभ्यास ?
लांडग्यांच्या वावरावर कुठेही बंधने न आणता त्यांच्या नैसर्गिक वर्तणुकीबाबत अभ्यास करण्यासाठी ग्रासलँड ट्रस्ट सध्या जर्मनीतील एका संस्थेच्या सहकार्याने ‘वुल्फ अँड पॅक बिहेविअर’ (Wolf and Pack Behavior) हा प्रकल्प राबवीत आहे.यामध्ये पुणे जिल्ह्यातील वेगवेगळ्या माळरानांवरील पाच लांडग्यांच्या कळपांची निवड करण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने कळपांवर सतत लक्ष ठेवून लांडग्यांच्या दैनंदिन सवयी, समुहात वावरताना असलेली मानसिकता भांडणे, यांच्या नोंदी घेतल्या जातात याकरिता वन कर्मचारी आणि स्थानिक तरुणांना प्रशिक्षित करण्यात येते.