Kerala Blasts : केंद्रीय मंत्र्याची स्पष्टोक्ती; ‘केरळ सरकारने हमासला बोलण्याची परवानगी दिल्यामुळेच…’

मी यासाठी केरळ सरकारला जबाबदार धरतो; कारण कालच त्यांनी दहशतवादी संघटना हमासच्या प्रमुखाला बोलण्याची परवानगी दिली. केरळ सरकारने तो कार्यक्रम होऊ दिला आणि 24 तासांनंतर आम्ही त्याचे परिणाम पाहत आहोत'', अशी टीका राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे.

196
Kerala Blasts : केंद्रीय मंत्र्याची स्पष्टोक्ती; 'केरळ सरकारने हमासला बोलण्याची परवानगी दिल्यामुळेच...'
Kerala Blasts : केंद्रीय मंत्र्याची स्पष्टोक्ती; 'केरळ सरकारने हमासला बोलण्याची परवानगी दिल्यामुळेच...'

रविवारी, २९ ऑक्टोबरला सकाळी एर्नाकुलम येथील एका ख्रिस्ती गटाच्या कन्व्हेन्शन सेंटरमध्ये झालेल्या स्फोटात एका व्यक्तीचा मृत्यू झाला, तर 30 हून अधिक जण जखमी झाले. (Kerala Blasts) स्फोटाच्या कारणाचा तपास केला जात आहे. या स्फोटानंतर केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी केरळ सरकारवर ताशेरे ओढले आहेत. “ख्रिश्चन समुदायाला लक्ष्य करणाऱ्या या स्फोटांबद्दल ऐकून खूप वाईट वाटले. हे अत्यंत निराशाजनक आहे. मी यासाठी केरळ सरकारला जबाबदार धरतो; कारण कालच त्यांनी दहशतवादी संघटना हमासच्या प्रमुखाला बोलण्याची परवानगी दिली. केरळ सरकारने तो कार्यक्रम होऊ दिला आणि 24 तासांनंतर आम्ही त्याचे परिणाम पाहत आहोत. केरळचे मुख्यमंत्री जे केरळचे गृहमंत्री देखील आहेत, ते दिल्लीत बसून राजकारण करत आहेत”, अशी टीका राजीव चंद्रशेखर यांनी केली आहे. (Kerala Blasts)

(हेही वाचा – Waqf Board Under RTI Act : वक्फ बोर्डाला मोठा धक्का; मशिदी, दर्गा आणि मदरशांनाही द्यावी लागणार ‘ही’ माहिती)

एर्नाकुलमच्या कलामस्सेरी येथे यहोवाच्या साक्षीदारांच्या प्रार्थनासभेदरम्यान सकाळी 9:40 च्या सुमारास हा स्फोट झाला. दहशतवादविरोधी पथक आणि राष्ट्रीय सुरक्षा रक्षक (एन.एस.जी.) यांची पथके स्फोटाच्या ठिकाणी पाठवण्यात आली आहेत. केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, ते परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. (Kerala Blasts)

स्थानिक दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील दृश्यांमध्ये अग्निशमन दल आणि पोलिस कर्मचारी मोठ्या संख्येने लोकांना घटनास्थळावरून बाहेर काढताना दिसत आहेत. केरळचे उद्योगमंत्री पी. राजीव यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्फोटाच्या ठिकाणी पोलीस आणि अग्निशमन दलाला बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी या घटनेनंतर सर्व सरकारी आरोग्य कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर हजर राहण्यास सांगितले आहे.

शनिवारी केरळमधील मलप्पुरम येथे हमासच्या समर्थनार्थ मोर्चा काढण्यात आला. हमासचा माजी प्रमुख खालिद मिशेल यानेही या सभेत भाषण केले होते आणि आज एर्नाकुलमच्या कलामस्सेरी भागातील कन्व्हेन्शन सेंटरमध्ये स्फोट झाला. त्यामुळे केरळ सरकारवर टीका होत आहे. (Kerala Blasts)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.