राज्यातील सर्वात मोठे शेततळे, तब्बल 30 हजार लोकांना वर्षभर पुरेल इतका पाणीसाठा

97

शेती व्यवसायाला मुबलक प्रमाणावर पाण्याची अत्यंत आवश्यकता असते. पावसाची अनिश्चितता असल्यामुळे अनेकदा राज्यातील शेतक-यांना अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे पावसाचे पाणी साठवून ठेवण्यासाठी शेतकरी शेततळी बांधतात. अशाच एका शेततळ्याची चर्चा मोठ्या प्रमाणावर होत आहे. तब्बल 52 फूट खोल असलेले हे शेततळे राज्यातील सर्वात मोठे शेततळे असल्याचे सांगण्यात येत आहे.

22 लाख रुपयांचा खर्च

जालना जिल्ह्यातील राणी उंचेगाव येथील शेतकरी लक्ष्मण सुरडकर यांनी अडीच एकर जागेमध्ये 1 हजार 50 वर्गफूट गोलाकार शेततळे बांधले असून, जे राज्यातील सर्वात मोठे शेततळे असल्याचे सांगण्यात येत आहे. हे शेततळे बांधण्यासाठी तब्बल 2 वर्ष लागली असून, त्यासाठी 22 लाख रुपये खर्च आला आहे. हे शेततळे 52 फूट खोल असल्याचे म्हटले जात आहे. पाणीटंचाईला कंटाळून त्यांनी इतके मोठे शेततळे उभारण्याचा निर्णय घेतला असून, त्यांना आपल्या शेतीला मुबलक पाणीपुरवठा करण्यासाठी या शेततळ्याचा चांगला उपयोग होणार आहे.

(हेही वाचाः कोरोना लस घेतल्यावर साईड इफेक्ट झाल्यास जबाबदार कोण? केंद्राने सर्वोच्च न्यायालयात दिले उत्तर)

पाणीटंचाईची समस्या सुटणार

तब्बल 30 हजार लोकांना वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा सध्या या शेततळ्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. या शेततळ्यामुळे शेतक-याची भविष्यातील पाणीटंचाईची समस्या सुटली आहे. हे शेततळे इतके भव्य आहे की 15 ते 20 कामगारांना या तळ्याच्या तळाशी मेनकापड अंथरण्यास अडीच दिवस लागले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.