छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करत ‘शिवाजी कोण होता ?’, असे पुस्तक विक्री होते. याच समवेत कोल्हापूर (Kolhapur) येथील विद्यापीठाचे नाव आदराने घेतले जाणे अपेक्षित असतांना ते ‘शिवाजी विद्यापीठ’ (Shivaji University) असे एकेरी उल्लेख करून ठेवण्यात येते. तरी यापुढील काळात कोट्यवधी हिंदूंसाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांचा अवमान आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही, तसेच ‘शिवाजी विद्यापीठा’चे ‘छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ’ असे नामांतर होण्यासाठी राज्यव्यापी आंदोलन उभे करण्याचा एकमुखी निर्धार हिंदु राष्ट्र समन्वय समिती आयोजित प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात करण्यात आला. या अधिवेशनाला श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक पू. संभाजीराव भिडेगुरुजी यांनी सदिच्छा भेट दिली.
या अधिवेशासाठी सांगली, कोल्हापूर आणि बेळगाव येथील विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी, उद्योजक, अधिवक्ता यांसह ५० हून अधिक हिंदू संघटनांचे २०० पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी व्यासपीठावर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, श्री श्री श्री १००८ महामंडलेश्वर आनंदसिद्ध महाराज, ह.भ.प. विठ्ठलतात्या पाटील, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे कोल्हापूर जिल्हा संयोजक आनंदराव पवळ, हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे राष्ट्रीय संघटक आणि हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक सुनील घनवट (Sunil Ghanwat) हे उपस्थित होते. या अधिवेशनासाठी हिंदू एकता आंदोलन, हिंदु महासभा, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, राष्ट्रीय बजरंग दल, श्रीराम सेना, सनातन संस्था, वारकरी संप्रदाय यांच्यासह ‘नरवीर शिवाकाशिद’ यांचे वंशज आनंदराव काशीद, ‘महाएनजीओ फेडरेशन’चे राज्य समन्वयक विजय वरूडकर, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजीराव भोकरे, गीता मंदिराचे विश्वस्त हसमुखभाई शाह, ऋण मातृभूमीचे सौरभ निकम आणि भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य महेश चौगुले उपस्थित होते.
(हेही वाचा – Train Accident साठी ट्रॅकवर ठेवला खांब; केरळ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून दोघांना अटक)
या अधिवेशनात विविध विषयांवर उद्बोधन सत्रे झाली. ‘हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि उपाय’ यांवर सद्गुरु स्वाती खाडये यांनी उपस्थितांनी संबोधित केले. या अधिवेशनात हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथील हिंदु राष्ट्र समन्वय समन्यय समितीचे नितीन काकडे यांचा अवैध मदरशाच्या बांधकाम पाडण्यासाठी दिलेल्या यशस्वी लढ्यासाठी सत्कार करण्यात आला.
हिंदुत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणार्या पुरोगाम्यांच्या ‘इकोसिस्टम’ला प्रत्युत्तर द्या ! – सुनील घनवट
अर्बन नक्षलवादाचा मोठा धोका भारतीय व्यवस्थेसमोर असून उद्योजक, पत्रकार यांसह समाजसेवकांचा बुरखा पांघरून भारतीय समाजमन, तरुण यांचे ‘ब्रेनवॉश’ करण्याचा प्रयत्न चालू आहे. विविध देशांमध्ये असलेली सरकार उलथून टाकून तेथे अराजक निर्माण करण्याचे जागतिक पातळीवर ‘डिप स्टेट’ची व्यवस्था कार्यरत आहे. हिंदु धर्म, संत, हिंदुत्वनिष्ठ, हिंदूंचे आदर्श यांच्या विरोधात जाणीवपूर्वक खोटी कथानके पसरवली जात आहेत. यातीलच एकप्रकारे म्हणून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी जाणीवपूर्वक भारत एक राष्ट्र नसून राज्यांचा समूह म्हणतात, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला पुण्यतिथीच्या शुभेछा देतात. तरी यापुढील काळात हिंदु धर्म आणि हिंदुत्वनिष्ठांवर बेछूट आरोप करणार्या पुरोगाम्यांच्या ‘इकोसिस्टम’ला चोख प्रत्युत्तर द्यावे, असे आवाहन समितीचे राष्ट्रीय संघटक सुनील घनवट (Sunil Ghanwat) यांनी या वेळी केले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community