पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये हर घर तिरंगा (Har Ghar Tiranga) अभियान साजरे करण्याबाबत केलेल्या आवाहनानुसार भाजपातर्फे राज्यभरात ९ ते १५ ऑगस्टदरम्यान हे अभियान मोठ्या उत्साहात साजरे केले जाणार असल्याची माहिती या अभियानाच्या प्रदेश संयोजक आ. उमा खापरे यांनी दिली.
हर घर तिरंगा अभियान…
भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रकाश नड्डा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली या अभियानातील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कालावधीत एक कोटी नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांना त्यांच्या घरावर तिरंगा लावण्यासाठी प्रेरित करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. राज्यभर लोकसहभागातून तिरंगा यात्रा, घरोघरी तिरंगा फडकवणे, महापुरुषांच्या स्मारक, पुतळ्यांची स्वच्छता, फाळणी विभीषिका स्मृतिदिन अशा विविध कार्यक्रमांचा समावेश असणार आहे, असेही त्यांनी नमूद केले.
क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंतचे नियोजन
९ ऑगस्टच्या क्रांतीदिनापासून ते स्वातंत्र्यदिनापर्यंत प्रत्येक घर, दुकान व कार्यालयावर राष्ट्रध्वज लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. अधिकाधिक लोकसहभागासाठी बूथ स्तरापर्यंतचे कार्यकर्ते जनजागृतीवर भर देणार आहेत. शाळा, महाविद्यालयांशी संपर्क साधून ध्वजारोहणासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. ११ ते १४ ऑगस्ट या काळात पक्ष संघटनेच्या प्रत्येक मंडलात तिरंगा यात्रा होणार आहेत. (Har Ghar Tiranga)
Join Our WhatsApp Community