पावसाळ्याच्या दिवसांत लोकल रेल्वे स्टेशन पाण्याखाली जाणे, सबवे पाण्याने भरणे याची मुंबईकरांना सवय आहे. आता नव्याने काम चालू असलेल्या मेट्रो ३ मार्गिकेवरील कंत्राटदाराने योग्य ती खबरदारी न घेतल्याने कुलाबा ते सीप्झ या तीन स्थानकांमध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. यामुळे नव्याने सुरू असलेल्या मेट्रो स्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाले आहे. तसेच या मार्गिकेचे काम धिम्या गतीने सुरू असल्याचा ठपका ठेवत मुंबई मेट्रो (Metro 3) रेल्वे कॉर्पोरेशनने (एमएमआरसी) जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांना आता २ कोटी रुपयांचा दंड लावला आहे.
(हेही वाचा – Canada Temple Attack : कॅनडामध्ये पुन्हा एकदा खलिस्तान्यांकडून हिंदूंच्या मंदिराची तोडफोड)
काम धिम्या गतीने
पॅकेज सहामधील सहा स्थानकांचे बांधकाम जे. कुमार आणि सीआरटीजी या कंत्राटदारांकडून संयुक्तरीत्या केले जात आहे. मात्र, त्यांच्याकडून याचे काम धिम्या गतीने सुरू आहे. स्थानकात पाणी शिरू नये, यासाठी उपाययोजना कंत्राटदाराकडून करणे अपेक्षित होते. मात्र, या कंत्राटदाराने त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. ६ जुलै आणि ७ जुलैच्या मध्यरात्री मेट्रो ३ मार्गिकेच्या स्थानकात पाण्याचा प्रवाह शिरल्याचा प्रकार घडला. त्यामुळे मेट्रो स्थानकांतील मालमत्तेचे नुकसान झाले. कंत्राटदाराने पाणी स्थानकात शिरू नये, यासाठी उपाययोजना केल्या नसल्याचेही समोर आले. बांधकामे झाकलेली नसल्याचेही आढळले. या हलगर्जीपणाबद्दल कंत्राटदाराला दंड लावण्यात आला आहे, अशी माहिती ‘एमएमआरसी’कडून देण्यात आली.
तपासणीला विलंब
मेट्रो ३ मार्गिका सुरू करण्यासाठी आरडीएसओ पथकाकडून नुकतीच तपासणी करण्यात आली आहे. त्यानंतर जुलैच्या मध्यावर सीएमआरएस पथकाकडून मेट्रो मार्गिकेची तपासणी होणे अपेक्षित होते. मात्र, मेट्रो स्थानकात पाणी शिरून नुकसान झाल्याने त्याचा फटका सीएमआरएस तपासणीला बसू शकतो.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community