नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर किल्ले सिंधुदुर्गवर छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Statue Of Chhatrapati Shivaji Maharaj ) पुतळा बसवण्यात येणार आहे. याकरिता प्रशासनाने खासगी जागा निवडली आहे, मात्र संबंधित मालकाने नकार दिला आहे. त्यामुळे पर्यायी जागेची चाचपणी प्रशासनाकडून केली जात आहे.
भारतीय नौदलाच्या स्थापनेपासून प्रथमच कोकणात नौसेना दिन किल्ले सिंधुदुर्गवर ४ डिसेंबर रोजी दिमाखात साजरा जाणार आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू , पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील मंत्री उपस्थित राहणार आहे.
(हेही वाचा – Congress : तेलंगणामधील काँग्रेसच्या सभेत ‘भारतमाते’च्या रुपात सोनिया गांधींचे बॅनर्स; संतापाची लाट उसळली)
Join Our WhatsApp Community