राज्यात कोरोनाच्या ‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटचे रुग्ण आढळले असले, तरी नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी केले आहे.
‘जेएन-१’ या नवीन व्हेरियंटच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सावंत यांनी आरोग्य विभागाच्या तयारीचा आढावा घेतला. त्यावळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
(हेही वाचा – Girish Mahajan : ‘मुंबई फेस्टिव्हल २०२४’ च्या यशस्वी आयोजनासाठी सर्वांनी समन्वयाने काम करा – गिरीश महाजन )
यावेळी पत्रकार परिषदेत ते म्हणाले की, ‘जेएन-१साठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यामुळे सगळ्यांनी नियमांचे काटेकोर पालन करावे. संशयित रुग्णांवर आवश्यक आणि काटेकोर उपचार करण्यात येतील. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर रुग्णालयांतील यंत्रणेचे गांभीर्याने मॉकड्रील करून तीन दिवसांत याविषयीचा अहवाल सादर करावा’, असे निर्देश आरोग्य विभागाला दिले आहेत.
चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार
‘जेएन-१’ हा व्हिरियंट धोकादायक नसला तिरीही आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी सर्व तयारीनिशी सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांमध्ये अफवा पसरून भीतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची काळजी जिल्हा स्तरातून घेण्यात येत असल्याची माहिती त्यांनी दिली तसेच विलगीकरण कक्ष, ऑक्सिजनची सुविधा, अतिदक्षता विभाग, व्हेंटीलेटर आणि महत्त्वाची उपकरणे कार्यरत आहेत की नाहीत याची संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्याचे व्हिडियो तयार करून संबंधितांना पाठवण्याची सूचना त्यांच्याकडून करण्यात आली आहे. याशिवाय प्रत्येक जिल्ह्यात चाचण्यांची संख्या वाढवण्याची गरज आहे. त्यामुळे चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्रीचा अवलंब करावा, अशी सूचना प्रशासनाला दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
Join Our WhatsApp Community