पावसाळ्यात लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून लांबच राहा; Mahavitaran चे आवाहन

135
Mahavitaran : दोन हजार ७७१ वीज ग्राहकांची वीज बिल थकबाकीतून मुक्ती

अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरीही लावली आहे. आता पावसासोबत येणाऱ्या वादळ वाऱ्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी खबरदारी घेण्याचे तसेच अतिवृष्टी, वादळामुळे तुटलेल्या वीजतारा किंवा शॉर्टसर्किटमुळे दुर्घटना होण्याची सावधानता बाळगावी, असे आवाहन महावितरणमार्फत करण्यात आले आहे. (Mahavitaran)

अतिवृष्टी, वादळाने तुटलेल्या वीजतारा, वीजखांब, रस्त्याच्या बाजूचे फिडर पिलर, रोहित्राचे लोखंडी कुंपण, फ्यूज बॉक्स तसेच घरातील ओलसर असलेली विद्युत उपकरणे, शेतीपंपाचा स्वीचबोर्ड आदींकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना होण्याची शक्यता अधिक असते. या दुर्घटना टाळता येणे सहज शक्य आहे. मुसळधार पाऊस आणि वादळी वारा यामुळे झाडाच्या मोठ्या फांद्या तुटून वीजतारांवर पडतात. तसेच झाडे पडल्याने वीजखांब वाकला जातो. परिणामी, वीजतारा तुटण्याचे प्रकार घडतात. त्यात वीजप्रवाह असण्याची शक्यता असल्याने अशा तुटलेल्या, लोंबकळणाऱ्या वीजतारांपासून सावध राहावे. या तारांना हात लावण्याचा किंवा हटविण्याचा प्रयत्न करू नये, पावसाळ्यात घरातील स्वीचबोर्डचा ओलाव्याशी संपर्क येणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन केले आहे. (Mahavitaran)

(हेही वाचा – उबाठा नेत्यांनी स्वाभिमान पाकिस्तानच्या झेंड्यासमोर गहाण ठेवला; Nitesh Rane यांचे टिकास्त्र)

अशी घ्या काळजी

घरातील वीजपुरवठ्याला आवश्यक अर्थिग केल्याची खात्री करून घ्यावी तसेच ईएलसीबी वापरावे. घरात शॉर्टसर्किट झाल्यास मेन स्वीच तात्काळ बंद करावा. घरावरील दूरचित्रवाणीची डिश किंवा अॅण्टेना वीजतारांपासून दूर ठेवावा. ओल्या कपड्यांवर विजेची इस्त्री फिरवू नये. विजेचे स्वीचबोर्ड किंवा कोणत्याही उपकरणाला पाणी लागणार नाही, याची दक्षता घ्यावी. विजेवर चालणारी सर्व उपकरणे स्वीच बोर्डापासून बंद करावीत. विशेषतः टीन पत्र्याच्या घरात राहणाऱ्या नागरिकांनी पावसाळ्यात अतिदक्ष राहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. (Mahavitaran)

टोल फ्री क्रमांकाची व्यवस्था

वीज सेवेच्या तक्रारींसह अतिवृष्टी किवा वादळामुळे वीजपुरवठ्यात तांत्रिक बिघाड होऊन दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणांची माहिती या टोल फ्री क्रमांकावर देण्याची सोय आहे. तसेच महावितरणच्या टोल फ्री कॉल सेंटरमध्ये ग्राहकांना केवळ एकदाच ग्राहक क्रमांक सांगावा लागतो. (Mahavitaran)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.