गेल्या आठवड्यापासून ‘ब्लु बॉटल जेलीफीश’, ‘स्टिंग रे’ प्रजातीचा वावर दिसून आला आहे. गेल्या आठवड्यात गिरगाव आणि जुहू चौपाटीला स्टिंगरे माशांचा वावर दिसून आला. काही रुग्णांना माशाच्या चाव्याने कुपर रुग्णालयात दाखल करावे लागल्याने अखेरीस पालिकेने चौपाटीला नागरीकांनी भेट देऊ नये, असे आवाहन केले आहे.
जेली फीशने दंश’ केल्याच्या पार्श्वभूमीवर आवश्यक उपाययोजना करण्याची विनंती मत्स्यव्यवसाय विभागाने मुंबई महानगरपालिकेला केली.ऑगस्ट ते ऑक्टोबर या महिन्यात मुंबई किनारपट्टीवर या कालावधीत नागरिकांना समुद्रात जाण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे (BMC Awareness). काही दिवसांपूर्वी मत्सव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जुहू चौपाटी येथे भेट दिली होती. त्यावेळीही जेलीफिशचा वावर त्या ठिकाणी दिसून आला होता.
(हेही वाचा : Mumbai Government Hospital: मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयात दररोज ५१ रुग्णांचा मृत्यू)
मुंबईकरांनो समुद्र किनारी काय खबरदारी घ्याल
1. नागरिकांनी समुद्रामध्ये जाताना उघड्या अंगाने जावू नये, तसेच पाण्यामध्ये जावयाचे झाल्यास ‘गमबुट’ वापरावेत आणि लहान मुलांना पाण्यामध्ये जावू न देण्याची खबरदारी घ्यावी.
2.माशांनी दंश केल्यास घाबरुन न जाता त्वरित महापालिका आरोग्य सेवेच्या केंद्रात त्वरित संपर्क साधावा.
3.समुद्र किनाऱ्याच्या परिसरात महापालिकेतर्फे लावण्यात आलेल्या सूचना फलकांवरील सूचनांचे व माईक मधून देण्यात येणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.
4.’स्टींग रे’चा दंश झाल्यास, अशा दंशामुळे नागरिकांना दंशाच्या जागी आग किंवा चटका लागल्याचा अनुभव येतो.जेलीफिशचा संसर्ग झाल्यास त्यांच्या दंशामुळे फार मोठ्या प्रमाणात खाज सुटते.मस्त्यदंश झालेली जखम स्वच्छ पाण्याने धुवून काढा.
5.जखम झालेल्या जागी बर्फ लावावा.
6.स्टींग रे किंवा जेली फिशचा दंश झाल्यास नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपल्या नजीकच्या प्रथमोपचार केंद्रात किंवा रूग्णालयात जाऊन प्रथमोपचार घ्यावेत. मस्त्यदंश झाल्यास चौपाट्यावर प्रथमोपचार करणारे पथकही सज्ज आहेत.