तिसऱ्या लाटेची भीती, तरीही नागरिकांची हलगर्जी! 

उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी आजही बिनधास्त तोंडावरचा मास्क हनुवटीवर आणून प्रवास करत आहेत. दादरच्या भाजी मार्केटमध्ये फेरीवाले विनामास्क फिरत आहेत.

72

मुंबईत जरी रुग्ण संख्या कमी झाली असली, तरी डेल्टा प्लस या कोरोनाच्या नव्या अवताराच्या भीतीमुळे तिसऱ्या लाटेची शक्यता आहे, त्यामुळे मुंबईत अजूनही कडक निर्बंध कायम करण्यात आले आहेत. तरीही नागरिकांमध्ये मात्र हलगर्जीपणा दिसून येत आहे. उपनगरीय लोकल ट्रेन असो कि भाजी मार्केट असो या ठिकाणी अनेकजण आता बिनधास्त तोंडावरचा मास्क हनुवटीवर आणून फिरत आहेत, तर फेरीवाले विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे मुंबईकरांना दुसऱ्या लाटेनंतरही कोरोनासंबंधी गांभीर्य उरलेले नाही, हे स्पष्ट होत आहे. उपनगरीय लोकलमध्ये प्रवास करणारे प्रवासी आजही बिनधास्त तोंडावरचा मास्क हनुवटीवर आणून प्रवास करत आहेत. दादरच्या भाजी मार्केटमध्ये फेरीवाले विनामास्क फिरत आहेत. त्यांच्याकडे महापालिकेचे क्लीन-अप मार्शल दुर्लक्ष करताना दिसत होते. तर छत्रपती शिवाजी महाराज मैदान (शिवाजी पार्क) येथे तर बहुतांश जण विनामास्क सोशल डिस्टंसिंगचे नियम धाब्यावर बसवून बसलेले होते.

(हेही वाचा : राज्याला ‘डेल्टा प्लस’चा धोका! राज्य सरकारने केल्या ‘या’ सूचना!)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.