Iran – Israel वॉरमुळे शेअर मार्केट ‘क्रॅश’

भारतीय शेअर बाजारावरही या युद्धाचा नकारात्मक परिणाम होत आहे. इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धाचा जागतिक पातळीवर परिणाम पडताना दिसतोय.

390
Lok Sabha Elections 2024 : निफ्टी २२,००० च्या खाली तर सेन्सेक्समध्येही ४,३९० अंशांची घसरण

इराण – इस्त्रायलच्या (Iran – Israel War) युद्धाची धास्ती संपूर्ण जगाने घेतली असून, याच युद्धाचा परिमाण आता भारतीय शेअर बाजारावरही (Indian Share Market) पडला आहे. परिणामी, मुंबई शेअर बाजार (BSE) आणि राष्ट्रीय शेअर बाजार (NSE) यांचे निर्देशांक चांगलेच गडगडले आहेत. (Iran – Israel)

(हेही वाचा – PM Narendra Modi यांनी सांगितले २० वर्षांचे व्हिजन; म्हणाले… )

१२ एप्रिल रोजी व्यवहाराच्या शेवटी, ३0 शेअर्सचा बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) सेन्सेक्स ८४५.१२ अंकांनी किंवा १.१४ टक्क्यांनी घसरून ७३,३३९.७८ अंकांवर बंद झाला. त्याचप्रमाणे नॅशनल स्टॉक एक्स्चेंजचा (NES) निफ्टीही २४६.९० अंकांनी किंवा १.१० टक्क्यांनी घसरून २२,२७२.५० च्या पातळीवर बंद झाला. (Iran – Israel)

गेल्या आठवड्यात या कंपन्यांचे शेअर्स ‘गडगडलेले’

गेल्या आठवड्यात सन फार्मा, मारुती सुजुकी, पॉवर ग्रीड, टायटन,जेएसडब्ल्यू स्टील, टेक महिंद्रा, लार्सन अँड टुब्रो, भारतीय स्टे बँके या कंपन्यांचे शेअर्स घसरले होते. तर दुसरीकडे टाटा मोटर्स, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, नेस्ले या कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यात गुरुवारी ईद-उल-फित्रमुळे शेअर बाजार बंद (Stock market closed) होता. (Iran – Israel)

हेही पाहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.