मुंबईत दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने पोटाचा संसर्ग वाढत असल्याची तक्रार वाढू लागली आहे. सतत धो धो बसणाऱ्या पावसामुळे मुंबईत पिण्याचा पाण्याची गुणवत्ता ढासळल्याची भीती व्यक्त होत आहे. पोटदुखी दोन ते तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहत असल्यास डॉक्टरांशी संपर्क साधा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.
यंदाच्या आठवड्यात पोटाच्या दुखण्याने हैराण झालेल्या रुग्णांमध्ये तीस टक्क्यांनी वाढ झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. मुंबईत साचलेल्या पाण्याच्या नजीकच्या रस्त्यावरील खाद्यपदार्थ खाऊन पोटाची बाधा झालेले रुग्ण वाढत असल्याचेही निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले आहे. अँटीबायोटिक्सचा पूर्ण कोर्स करूनही काही रुग्णांना पटकन आराम मिळत नसल्याने डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली.
(हेही वाचा – जखम असताना साचलेल्या पावसाच्या पाण्यातून चाललात, तर दुर्लक्ष करू नका..)
काय काळजी घ्याल –
– रस्त्यावरचे उघडे अन्नपदार्थ खाऊ नका.
– साचलेल्या पाण्याजवळच्या नागरी वसाहतीतील माणसांनी आरोग्याची आवश्यक काळजी घ्या.
– पाणी उकळून प्या.
– तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस पोटदुखी असल्यास तातडीने डॉक्टरांशी संपर्क साधा.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community