कर्नाटकातील (Karnataka) मंड्या येथील नागमंगला येथे बुधवार, १२ सप्टेंबरच्या रात्री श्री गणेश विसर्जन मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. ही घटना रात्री आठ वाजता घडली. म्हैसूर रस्त्यावरील दर्ग्याजवळ पोहोचल्यावर मिरवणुकीवर लोकांनी दगडफेक केली. दगडफेकीबरोबरच मिरवणुकीवर दगडांशिवाय तलवारी, रॉड आणि काचेच्या बाटल्यांनीही हल्ला करण्यात आला. त्यामुळे 15 पोलीस जखमी झाले आहेत. यानंतर हिंदूंनीही निदर्शने करून संताप व्यक्त केला. ल्या वर्षीही म्हैसूर रस्त्यावरील याच दर्ग्यासमोर मिरवणुकीवर दगडफेक झाली होती.
(हेही वाचा – Apple iPhone 16 Series Launched : मोठी स्क्रीन, किंमत कमी; ॲपल १६ सीरिज जगभरात लाँच )
परिसरातील काही दुकाने आणि तेथे उभी असलेली वाहने जाळण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला. भारतीय दंड संहितेतील कलम 163 (संचारबंदी) 3 दिवसांसाठी परिसरात लागू करण्यात आले आहे. या घटनेच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेने गुरुवारी बंद पुकारला आहे. येथील जिल्हाधिकाऱ्यांनी १२ सप्टेंबर रोजी नागमंगला येथील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. या प्रकरणी कर्नाटक पोलिसांनी ५२ जणांना अटक केली आहे.
मंड्याचे उपायुक्त डॉ. कुमार यांनी सांगितले की, “मिरवणुकीदरम्यान संध्याकाळी ही घटना घडली. मिरवणूक दर्ग्याजवळ पोहोचली, तेव्हा काही लोकांनी दगडफेक केली. याला विरोधही झाला. आयजी, एसपी आणि मी घटनास्थळी भेट दिली असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आवश्यक पावले उचलण्यात आली आहेत. १४ सप्टेंबरपर्यंत कलम १६३ लागू असणार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.”
मिरवणुकीवर दगडफेक झाल्यानंतर हिंदूंना परिसरात संचारबंदीची मागणी केली, तसेच श्री गणेशमूर्तीचे विसर्जन थांबवून ठेवले होते. (Karnataka)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community