Surat च्या गणेशोत्सव मंडपावर मुसलमानांकडून दगडफेक; 33 जणांना अटक

192
Surat च्या गणेशोत्सव मंडपावर मुसलमानांकडून दगडफेक; 33 जणांना अटक
Surat च्या गणेशोत्सव मंडपावर मुसलमानांकडून दगडफेक; 33 जणांना अटक

सुरतच्या (Surat) सय्यदपुरा भागात रविवार, ८ सप्टेंबरच्या रात्री उशिरा ६ मुसलमान तरुणांनी गणेशोत्सव मंडपावर दगडफेक केली. या घटनेनंतर स्थानिक हिंदू संघटनांनी रस्त्यावर उतरून प्रचंड संताप व्यक्त केला. हिंदूंच्या संतापानंतर पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या सहाही मुसलमान युवकांना अटक केली आहे. याशिवाय दगडफेकीच्या घटनेचे समर्थन करणाऱ्या २७ जणांनाही अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा – Paris Paralympics : ‘इतक्या’ पदकांसह भारताच्या सर्वाधिक यशस्वी पॅऱलिम्पिक खेळांची सांगता)

रात्री उशिरा पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज केला. अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या. या वेळी निर्माण झालेले तणावाचे वातावरण पहाता पहाटे २.३० च्या सुमारास गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी आणि स्थानिक भाजपा आमदार कांती बलर यांनी घटनास्थळी भेट दिली. तसेच त्यांनी या वेळी परिसरातील तणाव कमी करण्यासाठी स्थानिकांशी चर्चाही केली. ‘शांतता भंग करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. सुरतमध्ये पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी सांगितले आहे.

मूर्ती ठेवलेल्या ढोलाचीही तोडफोड – मंडळाच्या संयोजक मनीषाबेन

दगडफेक नक्कीच झाली असली तरी मूर्तीची मोडतोड झालेली नाही, असे गणेश मंडळाच्या संयोजक मनीषाबेन यांनी सांगितले. मूर्ती ढोलावर ठेवण्यात आली होती. दगडफेकीमुळे ढोल तुटला आहे; मात्र सुदैवाने मूर्ती थोडक्यात बचावली आहे. आम्ही या भागात अतिशय शांततेने राहतो आणि बंधुभाव जपतो. ताजियाच्या मिरवणुका आमच्या परिसरातून जातात, तेव्हा कोणतीही अनुचित घटना घडत नाही. गेल्या वर्षीही जवळच असलेल्या गणेश मंडळावर दगडफेक झाली होती, असेही त्यांनी सांगितले.

एक हजार पोलीस कर्मचारी तैनात

या घटनेविषयी बोलतांना सुरतचे पोलीस आयुक्त अनुपम गेहलोत म्हणाले की, काही मुलांनी गणेश मंडपावर दगडफेक केली आणि त्यानंतर हाणामारी झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब तेथून दूर नेले. पोलिसांना घटनास्थळी तत्काळ तैनात करण्यात आले. ज्या ठिकाणी आवश्यकता होती, त्या ठिकाणी लाठीमार करण्यात आला आणि अश्रुधुराचा वापरही करण्यात आला. शांतता भंग करणाऱ्या सर्व आरोपींना अटक करण्यात आली आहे. जवळपास एक हजार पोलीस कर्मचारी तैनात आहेत.”

जेथे मंडपावर दगडफेक झाली, त्या सय्यदपुरा भागात पोलीस मोठ्या प्रमाणावर शोध मोहीम राबवत आहेत. दगडफेक करणाऱ्यांची ओळख पटवून त्यांना अटक करण्यात येत आहे. त्याचबरोबर दोन धार्मिक गटांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी ड्रोनच्या सहाय्याने पाळत ठेवली जात आहे.

लाठीचार्ज आणि दगडफेक करणाऱ्यांना अटक करण्याबरोबरच परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन सुरू केले. पोलीस मंडपाजवळील घरांमध्ये जाऊन अन्वेषण करत आहेत. संपूर्ण सूरत (Surat) शहरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. तसेच शहरात सर्वत्र गस्त घालण्यास सुरुवात केली. नानपुरा, रांदेर, महाराणा प्रताप सर्कलसह भागांवर विशेष लक्ष ठेवण्यात आले आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.