Gujarat Shiv Yatra : गुजरातमध्ये शिव यात्रेवर मुस्लिमांकडून दगडफेक; ३ पोलिसांसह ६ जण जखमी; १५ जणांना अटक

134
Gujarat Shiv Yatra : गुजरातमध्ये शिव यात्रेवर मुस्लिमांकडून दगडफेक; ३ पोलिसांसह ६ जण जखमी; १५ जणांना अटक

गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये (Gujarat Shiv Yatra) भगवान शंकराच्या शोभायात्रेवर मुस्लिमांकडून दगडफेक करण्यात आली. यामध्ये ३ पोलिसांसह ६ जण जखमी झाले असून १५ जणांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील खेडा जिल्ह्यामधील ठासरा शहरामध्ये ही घटना घडली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबवत दगडफेक करणाऱ्या सहा जणांसह 15 जणांना बेड्या ठोकल्या आहेत.

खेडाचे पोलीस अधीक्षक राजेश गढिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, श्रावण महिन्याच्या अखेरच्या दिवशी शिव मंदिरातून (Gujarat Shiv Yatra) शोभायात्रा निघते. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या यात्रेमध्ये जवळपास ७०० ते ८०० शिवभक्त सहभागी झाले होते. ही शोभायात्रा तीन बत्ती भागामध्ये पोहोचताच मशिदीवरून मुस्लिमांनी दगडफेक सुरू केली.

(हेही वाचा – Chhatrapati Sambhajinagar : औरंगाबाद आणि उस्मानाबाद जिल्ह्याचे अधिकृत नामांतरण होणार; राज्यसरकारकडून राजपत्र जारी)

अचानक दगडफेक (Gujarat Shiv Yatra) सुरू झाल्याने शोभायात्रेमध्ये गोंधळ उडाला. लोकं सैरावैरा पळू लागले. दरम्यान, या दगडफेकीमध्ये सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या पोलिसांसह शिवभक्तही जखमी झाले आहेत. दगडफेकीनंतर पुन्हा दोन गट समोरासमोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. या दगडफेकीचे व्हिडीओही समाजमाध्यमांवर व्हायरल झाले असून मशिदीवरून दगडफेक (Gujarat Shiv Yatra) करत असल्याचे यात स्पष्ट दिसत आहेत.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.