उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधील (Lucknow) चिनहट पोलीस स्टेशन परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर दगडफेकीची घटना उघडकीस आली आहे. काही मुस्लिम तरुणांनी दगडफेक केल्याचा आरोप आहे. शाखा व्यवस्थापक युवराज प्रजापती याने साकिब आणि परिसरातील आठ ते 10 अज्ञात लोकांविरुद्ध एफआयआर दाखल केली आहे.
(हेही वाचा – Rohan Bopanna : पॅरिसमधील अपयशानंतर रोहन बोपान्नाची राष्ट्रीय टेनिसमधून निवृत्ती)
27 जुलै रोजी संध्याकाळी 6 वाजता दगडफेकीची घटना घडली. शाखा चालवणारा युवराज, चिनहट परिसरातील चोहरिया माता मंदिराच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शाखा चालवतो. पोलीस तक्रारीमध्ये असे लिहिले आहे की, दगडफेकीनंतर संघाची शाखा स्थापन न करण्याची धमकीही देण्यात आली होती. परिसरात शाखा चालू न देण्याची धमकीही आरोपींनी त्यांना दिली. पोलिसांनी या प्रकरणी एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.
कठोर कारवाई केली जाईल
चिन्हाटमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर झालेल्या हल्ल्याबाबत उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी निवेदन जारी केले आणि सांगितले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेवर झालेल्या हल्ल्याची चौकशी केल्यानंतर कठोर कारवाई केली जाईल. जूनमध्ये राजस्थानमधील भिलवाडामध्ये अशाच प्रकारची एक घटना घडली होती, जिथे एका विशिष्ट समाजातील डझनभर तरुणांनी आरएसएस कार्यकर्त्याला मारहाण केली होती. या घटनेचा तपशील देताना आर. एस. एस. चे विजय सोनी म्हणाले होते की, रविवारी संध्याकाळी महात्मा गांधी रुग्णालयाच्या आवारात असलेल्या उद्यानात शाखा सुरू असताना एका विशिष्ट समुदायाच्या लोकांनी त्यावर हल्ला केला.
मात्र, या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून दोन्ही बाजूंना शांत केले. (Lucknow)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community