माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक

45
माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक
माजी गृहमंत्री Anil Deshmukh यांच्या गाडीवर दगडफेक

माजी गृहमंत्री व शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुख यांच्या वाहनावर सोमवार, १८ नोव्हेंबरच्या रात्री अज्ञातांनी दगडफेक केली. नरखेड येथून प्रचारसभा आटोपून काटोलकडे परत जात असताना बेला फाट्यानजिक ही घटना घडली. अनिल देशमुख (Anil Deshmukh) गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमावर प्रसारित झाली असून त्यात देशमुख यांच्या चेहऱ्यावर जखमा दिसून येत आहेत. त्याच प्रमाणे त्यांच्या वाहनाच्या काचा फुटलेल्या दिसून येतात.

(हेही वाचा – Kho Kho Tournament : मुंबईतील मानाच्या महर्षी दयानंद आंतरमहाविद्यालयीन खो खो, कबड्डी स्पर्धेची घोषणा)

काटोल मतदार संघात (Katol Assembly constituency) अनिल देशमुख यांचा मुलगा सलील देशमुख हा शरद पवार (Sharad Pawar) गटाकडून उमेदवार आहे. त्याच्या प्रचारासाठी सोमवारी शेवटपर्यंत देशमुख प्रचारात सक्रीय होते. संध्याकाळी त्यांची नरखेडमध्ये सभा होती. ती आटोपून कार्यकर्त्यांसमवेत ते कारने काटोलकडे निघाले होते. या दरम्यान बेला फाट्याजवळ काही अज्ञातांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. यात अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना काटोलच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे.

या संदर्भात नागपूर ग्रामीण पोलिसांशी संपर्क साधला असता त्यांनी घटना घडल्याचे सांगितले. नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही घटना पोलिसांनी गांभीर्याने घेतली असून पोलीस पुढील तपास करत आहेत, असे सांगितले.

काटोलमध्ये सलील देशमुख यांच्याविरुद्ध भाजपचे चरणसिंह ठाकूर उभे आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) आणि भारतीय जनता पक्ष (BJP) यांच्यात वाद मागील काही वर्षांपासून सुरु आहे. अलीकडे त्यांच्या खंडणी प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्या. चांदीवाल (Justice Chandiwal Commission) यांनी एका मुलाखतीत खंडणी प्रकरणात कोणालाही ‘क्लिन चीट’ दिली नाही, असा दावा केला आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.