थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती

39
थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती
थांबा, विचार करा आणि मग कृती करा; Digital Arrest विषयी पंतप्रधानांनी केली जागृती

कुठलीही चौकशी करणारी संस्था अशा प्रकारे फोन करून किंवा व्हिडिओ कॉल करून चौकशी करीत नाही. त्यामुळे ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्राचा वापर करा. काही अडचण वाटली, तर १९३० या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला. लोकांना ‘डिजिटल अरेस्ट’ची (Digital Arrest) धमकी देऊन सायबर गुन्हे करणाऱ्यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवार, २८ ऑक्टोबर रोजी ‘मन की बात’मधून (Mann Ki Baat) दखल घेतली.

(हेही वाचा – J&K Attack: जम्मू-काश्मीरच्या अखनूरमध्ये लष्कराच्या रुग्णवाहिकेवर हल्ला!)

अशा प्रकारच्या धमक्या कुणाला येत असतील, तर सर्व नागरिकांनी ‘थांबा, विचार करा आणि मग कृती करा’ या मंत्राचा वापर करा. सायबर धमक्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी सायबर संस्था काम करीत आहेत. पण, अशा गुन्ह्यांपासून रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जागरुकता हवी,’ असे मत मोदींनी व्यक्त केले.

सायबर गुन्ह्यांना बळी पडलेल्यांचा फोनवरील संवादही मोदी यांनी कार्यक्रमात प्रसारित केला.

भारतीय हुशारीची दखल परदेशातही

‘छोटा भीम’, ‘हनुमान’, ‘मोटू-पतलू’ या भारतीय अॅनिमेटेड मालिकांची दखल पंतप्रधानांनी घेतली. जगामध्ये भारत नवी क्रांती आणण्याच्या दिशेने वाटचाल करीत असून, देशाला जगातील अॅनिमेशन क्षेत्रातील महत्त्वाचे केंद्र बनविण्यासाठी कटिबद्ध राहा. भारतीय हुशारीची दखल परदेशातही घेतली जाते. ‘स्पायडर मॅन’ किंवा ‘ट्रान्सफॉर्मर’ यांसारख्या चित्रपटांतून हरिनारायण राजीव यांच्या योगदानाचे जगभरातील लोकांनी कौतुक केले. डिस्ने, वॉर्नर ब्रदर्स यांसारख्या विख्यात स्टुडिओंबरोबर भारतातील लोक काम करीत आहेत. व्हर्च्युअल टूरसारखे अॅनिमेशन क्षेत्रही विस्तारले आहे. व्हर्च्युअल टूर मध्ये लोक वाराणसीचा घाट, कोणार्क मंदिर, अजिंठा लेणी एका जागी बसून पाहतात. व्हीआर अॅनिमेशनच्या माध्यमातून पाहिल्यानंतर अनेकांना या ठिकाणी प्रत्यक्ष जावेसे वाटते,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. (Digital Arrest)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.