उपहारगृह, हॉटेलमधील Tandoor च्या वापरात जळावू लाकडांचा वापर बंद; BMC ने दिली २५ जुलै २०२५ पर्यंतची मुदत

78

मुंबई, विशेष प्रतिनिधी

पाव, ब्रेड यांसारख्‍या पदार्थांचे उत्‍पादन करणाऱ्या भट्टी (bakery) तसेच हॉटेल्‍स आणि उपाहारगृहांमध्ये तंदूर (Tandoor Bhatti) अशा तत्‍सम व्‍यवसायांत दुय्यम दर्जाचे लाकूड किंवा मोडीत निघालेले फर्निचर यांचा देखील इंधन म्‍हणून उपयोग केला जातो. त्‍यातून घातक वायू बाहेर पडतात व सार्वजनिक आरोग्‍याला बाधा पोहोचते. त्यामुळे या प्रदुषणकारी भट्टया बंद करून येत्या ८ जुलै २०२५ पर्यंत हरित इंधनाचा वापर करावा, अन्यथा याच्यावर महापालिका प्रशासनाच्यावतीने सक्त कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराच महापालिकेने दिला आहे.  (BMC)

(हेही वाचा – Taxi करता इकोसोबत सीएनजीच्या इर्टिगा आणि बोलेरो या गाड्यांनाही परवानगी देण्याची मागणी )

वायू प्रदूषणासाठी (Air pollution) ज्‍या रितीने बांधकामे आणि प्रकल्‍पांमधून निर्माण होणारी धूळ व तत्‍सम घटक कारणीभूत ठरतात, त्‍याच रितीने लाकूड व कोळसा यांचा इंधन म्‍हणून उपयोग करणा-या भट्टी (बेकरी), हॉटेल्‍स्, उपाहारगृहे, खुल्‍यावर खाद्यपदार्थ विकणारे व्‍यावसायिक हे देखील वायू प्रदूषणास कारणीभूत ठरतात. यासंदर्भात माननीय उच्‍च न्‍यायालयाने देखील ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्‍या सुनावणीत ६ महिन्‍यांच्‍या मुदतीत लाकूड व कोळसा इंधन आधारीत व्‍यावसायिकांनी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश दिले आहेत. त्‍या दृष्‍टीने सर्व संबंधितांनी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा उपयोग करण्‍याची कार्यवाही करावी, अन्‍यथा त्‍यांना कठोर कारवाईला सामोरे जावे लागू शकते, असे महानगरपालिका (Mumbai Municipality) प्रशासनाकडून स्‍पष्‍ट करण्‍यात येत आहे.

मागील ९ जानेवारी २०२५ रोजी दिलेल्‍या आदेशात माननीय न्‍यायालयाने ६ महिन्‍यांच्‍या आत म्‍हणजेच ८ जुलै २०२५ पर्यंत लाकूड व कोळसा आधारीत सर्व व्‍यावसायिकांना कायमस्‍वरूपी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश दिले आहेत. तसेच, हरित व स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब न करणा-यावर कारवाई करण्‍याचे निर्देशदेखील महाराष्‍ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व मुंबई महानगरपालिकेलाही दिले आहेत.

(हेही वाचा – दिल्लीतील RSS च्या नवीन मुख्यालयात 19 फेब्रुवारीपासून कामकाजाला सुरुवात)

उच्‍च न्‍यायालयाच्‍या (High Court) आदेशांचे सर्व संबंधितांनी पालन करणे आवश्‍यक आहे, त्‍यामुळे जे व्‍यावसायिक लाकूड व कोळसा यांचा वापर करतात त्‍यांनी यापुढे इंधन म्‍हणून लाकूड व कोळसा यांचा वापर पूर्णपणे बंद करावा. त्‍याऐवजी पर्यायी स्‍वरूपात उपलब्‍ध असलेल्‍या स्‍वच्‍छ व हरित स्‍वरूपाच्‍या इंधनाचा (जसे की, सीएनजी, पीएनजी इत्‍यादी) वापर सुरू करावा. इंधनाचे असे रूपांतरण करण्‍याची ८ जुलै २०२५ ही अंतिम मुदत आहे. त्‍यामुळे या मुदतीच्‍या आत सर्व संबंधितांनी स्‍वच्‍छ इंधनाचा वापर सुरू करावा अन्‍यथा कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल, असे बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍यावतीने अतिरिक्‍त महानगरपालिका आयुक्‍त (शहर) डॉ. अश्विनी जोशी (Dr. Ashwini Joshi) यांनी स्‍पष्‍ट केले आहे. न्‍यायालयाचे आदेश येण्‍यापूर्वीच मुंबईत मागील तीन महिन्‍यात २९ बेकरींनी स्वतःहून लाकूड तथा कोळसा यांचा वापर बंद केला असून हरित इंधनाचा त्‍यांनी स्‍वीकार केला आहे. इतरांनी देखील त्‍याचे अनुकरण करावे, असे आवाहनही अश्विनी जोशी यांनी केले आहे.

हेही  पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.