लिबियाच्या पूर्व भागात डॅनियल या शक्तिशाली वादळामुळे पूर आला. या विनाशकारी पुरामुळे 2000 नागरिक बुडाल्याची शक्यता व्यक्त होत आहे.
याबाबत अल-मसर टेलिव्हिजन स्टेशनला फोनवरून दिलेल्या मुलाखतीत पंतप्रधान ओसामा हमद म्हणाले की, डॅनियल वादळानंतर आलेल्या मुसळधार पावसामुळे हजारो लोकं बेपत्ता झाले आहेत.येथील पूर्वेकडील डेरना शहरात 2000 लोकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे.शिवाय शहराचा एक भाग मोठ्या प्रमाणात खचला आहे. या विनाशकारी आपत्तीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी सोमवारी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आणि देशभरात झेंडे अर्ध्यावर फडकवण्याचे आदेश दिले.
Storm Daniel sweeps Libya, over 2000 feared dead
Read @ANI Story | https://t.co/8e5TIYRQ1Q#StormDaniel #Libya #Floods pic.twitter.com/lu43QLWMTg
— ANI Digital (@ani_digital) September 12, 2023
या पुराबाबत लिबियाच्या एका विरोधी पक्षाच्या प्रमुखाने सांगितले की, उत्तर आफ्रिकन देशाच्या पूर्वेकडील भागात पुरामुळे 2,000 लोकांचा मृत्यू झाल्याबद्दल काळजी व्यक्त केली आहे तसेच लिबियन सैन्याचे प्रवक्ते, मेजर जनरल अहमद अल-मिस्मारी म्हणाले की, 10,0000 लोकसंख्या असलेल्या डेर्नामध्ये 5,000 ते 6,000 लोकं बेपत्ता आहेत. दळणवळण कमी झाल्यामुळे मृतांची नेमकी संख्या मोजणे कठीण होत आहे. त्यामुळे संयुक्त अरब अमिराती आणि इतर संस्था या प्रदेशात आपत्कालिन मदत पोहोचवत आहेत तसेच येथे स्ट्रेचर, अन्न आणि पाण्याची आवश्यकता असल्याची माहितीही स्थानिक अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community