प्रादेशिक हवामान विभागाने राज्याच्या किनाऱ्यालगत असलेल्या मच्छीमारांना सतर्कतेचा व समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची माहिती बुधवारी सिंधुदुर्ग मत्स्य विभागास प्राप्त झाली आहे. त्यानुसार मत्स्य विभागाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मच्छीमारांना खबरदारीचे आवाहन केले आहे.
( हेही वाचा : …तर महापालिकेच्या २२०० पदविकाधारक अभियंत्यांवर होईल दुष्परिणाम! )
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा
सिंधुदुर्ग किनारपट्टीवर ११ सप्टेंबरपर्यंत वादळी वारे वाहणार असून वाऱ्यांचा वेग ६५ किलोमीटर प्रतितास पोहचण्याची शक्यता आहे. तरी मच्छीमारांनी मासेमारीसाठी समुद्रात अथवा खाडी क्षेत्रात जाऊ नये. नौका, जाळी व मासेमारी सामग्री सुरक्षित ठेवावी. असे आवाहन सिंधुदुर्गातील सहायक आयुक्तांनी मच्छीमारांना बुधवारी केले आहे.
एकूणच समुद्रात वादळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. मच्छीमारांनी आपल्या नौका सुरक्षित स्थळी नेण्यास सुरुवात केली आहे. तर गेले दोन दिवस सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या अनेक भागात विजांच्या गडगडटासह पाऊस पडत आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेता मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
Join Our WhatsApp Community