Street Dog : मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या घटली; ‘या’ सर्वेक्षणातून आकडेवारी आली समोर, वाचा

94
Street Dog : मुंबईत भटक्या कुत्र्यांची संख्या व त्यांचा उपद्रव रोखण्यासाठी आणि त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई महापालिकेने एका खासगी संस्थेच्या मध्यांतून संयुक्तपणे सर्वेक्षण केले असून त्याचा अहवाल प्रशासनाला सादर करण्यात आला आहे. त्यानुसार मुंबईत २०१४ ला करण्यात आलेल्या सर्वेक्षणात भटक्या कुत्र्यांची संख्या ९५ हजार १७२  एवढी असल्याचे निदर्शनास आले होते, मात्र आता २०२४ मधील सर्वेक्षणात कुत्र्यांची संख्या ९० हजार ७५७  एवढी असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे गेल्या १० वर्षात कुत्र्यांच्या संख्येत ४ हजार ४१५ ने घट झाली असल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. तसेच महापालिकेच्या ई, एन, आर दक्षिण आणि टी या चार प्रभागांमध्ये फक्त कुत्र्यांची संख्या लक्षणीय रीत्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली.  (Street Dog)
महानगरपालिकेच्या वतीने ह्युमन सोसायटी इंटरनॅशनल इंडिया (Humane Society International India Institution) यांच्या सहकार्याने मुंबईत बेसलाइन स्ट्रीट डॉग सर्वेक्षण (Baseline Street Dog Survey in Mumbai) करण्यात आले. यात ९० हजार ७५७ इतके भटके कुत्रे आढळून आले आहेत. शहरातील एकूण ९३० किलोमीटर रस्त्यांवर हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणानंतर प्रति किलोमीटर ८.१ टक्के असे भटक्या कुत्र्यांचे प्रमाण आढळून आले. झोपडपट्ट्यांमध्ये प्रति एक किलोमीटर चौरस क्षेत्रात २२४ कुत्रे आढळले. या दोन्ही प्रमाणात २०१४ च्या सर्वेक्षणाच्या तुलनेत अनुक्रमे २१.८ टक्के आणि २७.४ टक्के इतकी घट नोंदवण्यात आल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. २०१४ मध्ये मुंबईत ९५,१७२ इतकी कुत्र्यांची संख्या नोंदवण्यात आली होती. जी प्रति किलोमीटर १०.५४ टक्के इतकी होती. एकूणच मुंबईतील १९ वार्डामध्ये कुत्र्याचे प्रमाण या सर्वेक्षणात ३१.६ टक्क्यांनी कमी झाल्याचे आढळले आहे.

(हेही वाचा – दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष Yoon Suk-yeol यांना पदावरून हटवले)

चार प्रभागांत लक्षणीय वाढ
उर्वरित १४ विभागांत संख्येत घट झाली असली तरी ई, एन, आर दक्षिण आणि टी या विभागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे प्रमाण १९.९ टक्के वाढले आहे, तर डी प्रभागातील कुत्र्यांची संख्या स्थिर राहिल्याचे निरीक्षण आहे. स्तनपान करणाऱ्या मादींचे प्रमाण ७.१ टक्क्यांपर्यंत घसरले, तरीही पिल्लांची संख्या ४.३ टक्क्यांवर गेली. सर्वसाधारणपणे घट झाली असली, तरी चार वॉर्डमध्ये कुत्र्यांची घनता वाढणे आणि विशेषतः आर दक्षिण व टी या सीमावर्ती वॉर्डामध्ये मुंबईबाहेरून कुत्र्यांचे स्थलांतर किंवा मानवी हस्तक्षेपामुळे पिल्लांचे जगण्याचे प्रमाण वाढल्याचे समोर येत आहे. तसेच गेल्या वर्षीचा नसबंदीचा दर ६२.९% नर ६१.७५% मादी असा होता.

(हेही वाचा – राज्यभरातील परिवहन विभागाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटवण्याचे मंत्री Pratap Sarnaik यांचे निर्देश)

तक्रारींमध्येही घट
कुत्र्याशी संबंधित तक्रारी आणि श्वानदंशाच्या (Dog bite) घटनांमध्ये सन १९९७ च्या तुलनेत सामान्यतः घट झाली आहे. पालिकेच्या आकडेवारीनुसार २०२२ मध्ये कोरोनानंतर तक्रारी आणि घटना या दोन्हींमध्ये वाढ झाली होती. सर्वसाधारणपणे जुलै आणि ऑगस्टच्या पावसाळी हंगामात कुत्र्यांशी संबंधित तक्रारी शिगेला पोहोचतात. हा काळ प्रजननाचा असल्याने या काळात कुत्रे अधिक आक्रमक असतात; पण त्यांचे चावा घेण्याचे प्रमाण मात्र या काळात कमी असते. श्वानदंशाचे प्रमाण हिवाळा आणि वसंत ऋतूच्या उत्तरार्धात अधिक वाढतात, असेही या सर्वेक्षणात समोर आल्याचे पालिकेने (BMC) म्हटले आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.