स्ट्रिट फर्निचरची कामे ही केवळ उधळपट्टी; काँग्रेसने नोंदवला आक्षेप

156

पदपथ आणि रस्त्यांची सुधारणा करताना आधुनिक, आकर्षक, टिकाऊ स्ट्रीट फर्निचरचा त्यात समावेश करावा. विशेषतः पदपथांवर जिथे शक्य आहे, तिथे नाविन्यपूर्ण, कलापूर्ण व परिसर सौंदर्य वाढविणारी आसने लावण्याचा निर्णय मुंबई सौंदर्यीकरण प्रकल्पांतर्गंत हाती घेण्यात आले असून या स्ट्रीट फर्निचर बसवण्यावर सुमारे २६३ कोटी रुपयांचा खर्च केला जाणार आहे. ही एक प्रकारची उधळपट्टी असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला.

महापालिकेची करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी असल्याचा आरोप

मुंबईत सौंदर्यीकरणाचा प्रकल्प हाती घेतला असून याअंतर्गत रस्त्यांच्या पदपथावर बसवण्यात येणाऱ्या स्ट्रीट फर्निचरबाबत महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी ट्विटरच्या माध्यमातून आक्षेप नोंदवत जोरदार टिका केली आहे. ट्विटरवर पोस्ट करत राजा यांनी, मुंबई महापालिकेची करदात्यांच्या पैशाची उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप केला आहे. मुंबईच्या सुशोभिकरणाच्या नावाखाली जवळपास १७०० कोटी रुपयांची कामे काढून झाल्यावर आता महापालिका स्ट्रीट फर्निचर बसवण्यावर २६३ करोड रुपये खर्च करणार आहे. ही उधळपट्टीची हद्द असल्याचे म्हटले आहे.

(हेही वाचा पंतप्रधानांच्या दौऱ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना फडणवीसांचा टोला; म्हणाले…)

वाट्टेल तशी मनमानी सुरु

मुळात स्ट्रीट फर्निचर कुठे बसवले जाणार आहेत? खरंच त्याची गरज आहे का? ह्याचा काहीही विचार न करता टेंडर काढले जात आहे. आणि टेंडर सुद्धा असे काढले जाते, ज्यात विशिष्ट कंपनीचा फायदा होईल, असे बघितले जाते. महापालिका आयुक्तांचे याकडे लक्ष आहे का, असा सवाल केला आहे. महापालिकेचा कारभार प्रशासक चालवत असल्यामुळे, वाट्टेल तशी मनमानी सुरु आहे. ह्याचा आम्ही निषेध करतो, असे सांगत त्यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना याप्रकरणात लक्ष घालून ही उधळपट्टी तात्काळ थांबवावी अशाप्रकारची मागणी केली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.