आता आणखी कडक निर्बंध… काय असू शकतात नवे निर्णय?

फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

74

वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्य सरकारने राज्यात संचार बंदी लागू केली. मात्र तरी देखील रस्त्यावरील गर्दी काही कमी होताना दिसत नाही. याचमुळे आता राज्य सरकार आणखी कडक निर्बंध लावणार असून, विनाकारण गाडीने फिरणा-यांना पेट्रोल-डिझेल न देण्याचा निर्णय राज्य सरकार घेण्याच्या तयारीत आहे. येत्या दोन दिवसांत कडक कारवाई केली जाणार असून, सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल-डिझेल मिळणार नाही. तहसीलदारांच्या पत्रानुसार, फक्त अत्यावश्यक सेवेसाठी इंधन दिले जाणार असून, त्याबाबत सरकार विचाराधीन असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे.

लोकल बाबतही कडक नियम

लोकल सेवेचा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनी वगळून, इतरांनी वापर केल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई केली जाणार आहे. लोकल सेवा वापराबाबत कडक निर्बंध करावे यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलणी झाल्याचे विजय वडेट्टीवार यांनी सांगितले.

(हेही वाचाः ब्रेक दि चेन: लोकल ट्रेनने प्रवास करता येईल का? निर्बंधांबाबत आपल्या मनातील प्रश्नांची उत्तरे एका क्लिकवर…)

भाजीपाला, किराणा दुकानांची सूट रद्द होणार?

परप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी सूट दिली आहे. त्याचा फायदा घेऊन खाजगी आणि सार्वजनिक वाहतूक केली जात आहे. आम्ही अजून एक दिवस जनतेला विनंती करतो, अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही वडेट्टीवार यांनी दिला आहे. त्याचबरोबर अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला आणि किराणा यांना दिलेली सूट रद्द करता येईल का? याबाबतही सरकार विचाराधीन असल्याची माहिती वडेट्टीवार यांनी दिली.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.