बेस्ट उपक्रमातील भाडेतत्त्वावरील वाहक, चालक यांनी विविध आर्थिक मागण्यांसाठी सोमवार, १३ जानेवारी या दिवशी सकाळीपासून काम बंद आंदोलन पुकारले आहे. त्याचा थेट फटका बेस्ट प्रवाशांना बसला आहे. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकाळपासून धारावी, प्रतीक्षानगर आगारातून बस चालवण्यात येत नसल्याने प्रवासी खोळंबले आहेत. विविध बस थांब्यांवर शेकडो प्रवासी बसची (Best Buses) वाट पहात उभे राहिले आहेत. आंदोलनामुळे प्रतीक्षानगर आणि धारावी आगारातील अनुक्रमे ११० व १०० क्रमांकाच्या बसगाड्यांच्या फेऱ्यांवर परिणाम झाला आहे.
(हेही वाचा – जम्मू-काश्मिर, चीन बॅार्डर आणि मणिपूर हिंसाचारावर लष्करप्रमुख Upendra Dwivedi काय म्हणाले ?)
काय आहे प्रकरण ?
मातेश्वरी बस कंपनीच्या प्रतीक्षानगर (Pratikshanagar Depot) आगारातील महिला वाहक सुप्रिया एस. कदम या गर्भवती आहेत. त्यांना कामासाठी बसगाडीवर न पाठवता आगारामध्ये इतर हलके काम देण्यात यावे, अशी विनंती करण्यात आली होती. यानंतर प्रतीक्षानगरचे आगार व्यवस्थापक सलीम खत्री यांनी महिला वाहकाला भेटण्यास बोलावले. याविषयी गैरसमज होऊन माथाडी कामगारांचे सचिव प्रदीप मगरे आणि महिला वाहक सुप्रिया कदम यांनी सलीम खत्री यांना मारहाण केली. या प्रकाराची वडाळा ट्रक टर्मिनल पोलीस स्थानकात तक्रार नोंदवण्यात आली आहे. या घटनेनंतर भाडेतत्त्वावरील वाहक, चालक यांनी काम बंद आंदोलन पुकारले आहे. (Best Buses)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community