राज्यातील अकृषी विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी गुरुवारी बेमुदत संप पुकारला आहे. तसेच विद्यापीठ आणि महाविद्यालयात सुरू असलेल्या परीक्षेच्या कामकाजावर शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी बहिष्कार टाकला आहे. याचा फटका मुंबईसह राज्यातील इतर विद्यापीठांतील परीक्षांना बसला आहे. अनेक विद्यापीठाने गुरुपासून सुरू झालेल्या परीक्षा स्थगित केल्या आहेत.
माहितीनुसार, शिक्षेकत्तर कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठातील सर्व परीक्षा स्थगित करण्यात आल्या आहेत. एकूण ३२ परीक्षांचे वेळापत्रक पुढे ढकलण्यात आले आहे. तसेच पुण्यश्र्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापाठीच्या गुरुवारपासून होणाऱ्या परीक्षाही स्थगित करण्यात आल्या आहेत. पुढील आदेशापर्यंत परीक्षा स्थगित केल्याची माहिती परीक्षा आणि मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांनी दिली आहे.
काही दिवसांपूर्वी शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांची मागण्यासंदर्भात उच्च व तंत्रशिक्षणमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांसोबत चर्चा झाली होती. ही चर्चा सकारात्मक झाली असूनही त्याची पुर्तता झाली नसल्यामुळे शिक्षकत्तेर कर्मचाऱ्यांनी गुरुवारपासून बेमुदत संप पुकारला आहे.
(हेही वाचा – राज्यातील रुग्णांना उपचार देणारी ई-संजीवनी बंद)
Join Our WhatsApp Community