भाजपच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याला पाठिंबा देत त्यांच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर पोस्ट लिहिली म्हणून काही दिवसांपूर्वी राजस्थानमधील कन्हैया लाल यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील अमरावती शहरात राहणाऱ्या उमेश कोल्हे यांचीदेखील हत्या करण्यात आली. त्याच निषेधार्थ पुण्यात विश्व हिंदू परिषदेने जोरदार आंदोलन केले आहे.
( हेही वाचा: शिंदे सरकारवर शिक्कामोर्तब, जिंकला विश्वासदर्शक ठराव )
जिहादी मानसिकतेने हत्या
पुण्यातील बालगंधर्व चौकात जोरदार घोषणाबाजी करत, विश्व हिंदू परिषदेने हे आंदोलन केलं आहे. राजस्थान आणि महाराष्ट्रात झालेल्या या दोन्ही हत्या जिहादी मानसिकता असणाऱ्या धर्मांध लोकांकडून झाल्या असून, या हत्या आतंकवादी पद्धतीने करण्यात आल्या असल्याचा, आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. केंद्र सरकारने या दोन्ही घटनेचा तपास करून आरोपींना फासावर लटकवावं, अशी मागणीदेखील आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
Join Our WhatsApp Community