दिल्ली, उत्तर प्रदेशात भूकंपाचे दोन धक्के, परिसरात खळबळ

127

राजधानी दिल्ली आणि उत्तर प्रदेशात मंगळवारी रात्री भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत. उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊ, तसेच कानपूर,मुरादाबाद,बरेली,आग्रा आणि मेरठसह अन्य काही जिल्ह्यांमध्ये भूकंपाचे दोन धक्के जाणवल्याची माहिती मिळत आहे.

मंगळवारी रात्री 8 वाजून 52 मिनिटांनी पहिल्यांदा या भागांत भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी कडून देण्यात आली आहे. या भूकंपाचे केंद्र नेपाळमध्ये असल्याचेही सांगण्यात येत आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे राजधानी दिल्लीसह उत्तर प्रदेशात रात्री एकच खळबळ उडाली आहे.

दोन सौम्य धक्के

मंगळवारी रात्री 8.52 वाजता झालेल्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.9 रिश्टर इतकी होती. मात्र मध्यरात्री 1 वाजून 57 मिनिटांनी झालेल्या भूकंपाची तीव्रता ही 6.3 रिश्टर इतकी नोंदवली गेली आहे. या भूकंपाची खोली जमिनीपासून 10 किमी खाली असल्याचे सांगण्यात येत आहे. या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

https://twitter.com/NCS_Earthquake/status/1590006166427684865?s=20&t=Tpx3NBru2VJgVFRbUm-oAQ

नेपाळमध्ये 6 जण दगावले

भूकंपाचे केंद्रस्थान असलेल्या नेपाळमध्ये या भूकंपामुळे जीवितहानी झाल्याची माहिती मिळत आहे. नेपाळमध्ये भूकंपामुळे 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

याआधी मध्य प्रदेशात भूकंप

या भूकंपाची केंद्र हे भारत आणि नेपाळच्या सीमेवरील धारचुला भागात आहे. 1 नोव्हेंबर रोजी सकाळी 8 वाजून 43 मिनिटांनी मध्य प्रदेशात देखील भूकंपाचे धक्के जाणवले होते. मध्य प्रदेशातील जबलपूर आणि आसपासच्या काही जिल्ह्यांमध्ये 4.3 रिश्टरचे भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.