अंधेरी जोगेश्वरी पश्चिम भागात पाच वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या ११४ हायमास्टचे स्ट्रक्चरल ऑडीट केले जाणार आहे. या ११४ हायमास्टपैंकी ६० हायमास्ट हे नादुरुस्त झाले असून उर्वरीत ५४ हायमास्ट हे चांगल्या स्थितीत आहे. त्यामुळे ६० हायमास्टची दुरुस्ती करण्यापूर्वी सर्वच हायमास्टचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम अर्थात ‘के/पश्चिम’ प्रभागात वर्ष २०१३-१७ या कालावधीत रस्ते दुभाजक व रस्त्यांवर एकूण ११४ हायमास्ट उभारण्यात आले होते. या ११४ हायमास्टमध्ये वारंवार बिघाड होत आहे. तसेच काही काही हायमास्ट धोकादायक स्थितीत असल्याच्या तक्रारी महापालिकेच्या कार्यालयात प्राप्त झाल्या आहे आहेत. त्यानुसार या हायमास्टची दुरुस्ती तसेच हायमस्टच्या फाऊंडेशन स्टॅबीलिटी चाचणी करण्याच्या सूचना सहायक आयुक्तांनी कळवले होते. त्यानुसार या भागातील अभियंत्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असत त्यामध्ये ५४ हायमास्ट हे सुस्थितीत होते, तर उर्वरीत ६० हायमास्टचे दुरुस्ती आवश्यक होते. तरीही सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सर्व ११४ हायमास्टच्या फाऊंडेशनच्या स्टॅबीलिटी चाचणी करणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. त्यानुसार यासाठी हायमास्टची दुरुस्ती व सर्व हायमास्टचे फाऊंडेशची चाचणी करण्यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये चैत्रा इलेक्ट्रिकल्स एँड इंजिनिअरींग ही कंपनी पात्र ठरली असून यासाठी सुमारे ७० लाख रुपये खर्च केले जाणार आहे.
(हेही वाचा – ग्लोव्हज्, मास्क, पीपीई कीट्ससह औषधसाठा व इतर वैद्यकीय सामग्री खरेदीचे महापालिकेचे निर्देश)
Join Our WhatsApp Community