आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी (Kumbhmela) केंद्र सरकारच्या शंभर कोटी निधीतून रामकुंड (ramkund) व गोदाघाट (Goda Ghat) परिसरात ‘रामकाल पथ’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू झाले आहे. रामकुंडासह परिसरातील पौराणिक दहा वास्तूंच्या मजबुती तपासणीसाठी त्यांचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) केले जाणार आहे. त्यासाठी सल्लागार गुजरातमधील एचसीपी कंपनीचे पथक शहरात दाखल झाले आहे. लवकरच कामाला सुरुवात होणार आहे.
(हेही वाचा – Gokhale Bridge : गोखले रोडचे पूल मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होणार खुले)
‘रामकाल पथ’ साठी रामायण ही थीम असून, रामकुंड (Ramkund) ते काळाराम मंदिर हा एक किलोमीटर अंतराचा पौराणिक महत्व सांगणारा आध्यात्मिक कॉरिडॉर साकारला जाणार आहे. या परिसरात अनेक जुन्या पौराणिक महत्त्वाच्या वास्तू ऐतिहासिक काळापासून उभ्या आहेत. या प्रकल्पासाठी गुजरातमधील एचसीपी या कंपनीची महापालिकेकडून सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपनीने साबरमती रिव्हर फ्रंट, बाबा विश्वनाथ कॉरिडॉर अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सल्लागार म्हणून काम केले आहे. या कंपनीचे पथक शहरात दाखल झाले आहे. त्यांच्याकडून येथील वास्तूंचे स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) केल्यानंतर मनपा आयुक्तांकडे याकामाचा अहवाल सादर केला जाणार आहे. त्यानंतर कोणत्या धार्मिक वास्तूंमध्ये बदल करायचा की नाही, यावर मनपा आयुक्त निर्णय घेतील. त्यांच्या सूचनेनंतर संबंधित बदल केले जातील.महापालिका प्रशासनाकडूनदेखील खरोखरच स्ट्रक्चरल ऑडिट (Structural Audit) वास्तूंमध्ये केलेल्या दुरुस्तीसहसुशोभीकरणाची आवश्यकता आहे का? याची खातरजमा करण्यात येणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यापूर्वी रामकाल पथ प्रकल्प मार्गी लावण्याचे प्रयत्न असणार आहेत. कॉरिडॉर परिसरात रामायणातील प्रसंगांवर आधारित शिल्प साकारले जाणार आहे
कोणाचे स्ट्रक्चर ऑडिट?
गांधी ज्योत, होळकरकालीन दोन वास्तू गंगा-गोदावरी मंदिर, दुतोंड्या मारुती, रामकुंडावरील दशक्रिया विधीप्रसंगी घास ठेवण्याची वास्तू , रामकुंड लक्ष्मणकुंड , काळाराम मंदिर परिसरातील संरचना , सीतागुंफा परिसर.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community