Sambhajinagar : आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड; पोलीस उपायुक्ताच्या मुलाची आत्महत्या

217
Sambhajinagar : आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड; पोलीस उपायुक्ताच्या मुलाची आत्महत्या
Sambhajinagar : आयआयटीमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी धडपड; पोलीस उपायुक्ताच्या मुलाची आत्महत्या

शहर पोलीस दलातील पोलीस उपायुक्त (प्रशासन) शीलवंत नांदेडकर यांचा मुलगा साहिल याने रहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. बारावीत शिकणाऱ्या साहिल याने रविवार, १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ६ वाजता आत्महत्या केली. या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली आहे. (Sambhajinagar)

(हेही वाचा – Ind vs Aus, Women’s T20 WC : ऑस्ट्रेलियाकडून निसटत्या पराभवानंतर भारतीय महिलांचं उपांत्य फेरीचं गणित कठीण )

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार साहिल आई-वडिलांसह शनिवारी रात्री उशिरापर्यंत सोबत होता. सकाळी वडील मार्निंग वॉकला बाहेर जाण्यासाठी निघाले असता, तेव्हा मुलाने बेडरूममध्येच आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. त्या ठिकाणी तपासून त्याला मृत घोषित केले. साहिलवर प्रतापनगर स्मशानभूमीत दुपारी ४ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलिस अधिकारी, निरीक्षक, राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील नागरिकांची उपस्थिती होती. आत्महत्येपूर्वी घरातील आरशावर साहिलने नवीन जीवनाला सुरुवात करीत असल्याचे लिहीत आई- वडिलांविषयी प्रेम व्यक्त केले आहे.

साहिल हा आयआयटीमध्ये (IIT) प्रवेश मिळवण्यासाठी जेईई अॅडव्हान्स परीक्षेची तयारी करीत होता. तो अभ्यासातही अतिशय हुशार होता. मात्र, टोकाचे पाऊल उचलल्यामुळे त्याच्या नातेवाइकांसह संपूर्ण शहर पोलीस प्रशासनालाच धक्का बसला आहे. या प्रकरणी वेदांतनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. (Sambhajinagar)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.