Karnataka : एसटी महामंडळाच्या (ST BUS) बस कर्नाटक राज्यात जात नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. तर दुसरीकडे याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स (Private Travels) वाहतूकदारांनी तिकीट दरात वाढ केली आहे. यामुळे मुंबईतून बेळगावकरिता सीटिंग बसकरिता ७०० ते एक हजार रुपयांचे तिकीट होते. त्याच तिकिटासाठी आता १४०० ते २ हजारांपर्यंत मोजावे लागत असल्याने प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. (Karnataka)
शुक्रवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग (Chitradurg) येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. या घटनेमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यात पुन्हा एकदा भाषिक वाद (Linguistic controversy) निर्माण झाला आहे. याचे पडसाद महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही राज्यांत उमटले आहेत. या घटनेचा निषेध करत एसटी महामंडळातील प्रवासी व कर्मचाऱ्यांची सुरक्षितता लक्षात घेऊन पुढील अनिश्चित काळासाठी कोल्हापूर विभागातून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या महाराष्ट्राच्या एसटी बस रद्द करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Minister Pratap Sarnaik) यांनी घेतला आहे. त्यातून शुक्रवार रात्रीपासून महाराष्ट्रातून खासगी ट्रॅव्हल्सचे तिकीट दर मार्ग मुंबई-बेळगाव पुणे-बेळगाव कोल्हापूर-बेळगाव कर्नाटकात जाणाऱ्या सर्व एसटीच्या फेऱ्या रद्द केल्या आहेत. दिवसभरात एसटी महामंडळाच्या कर्नाटकासाठी ८२ फेऱ्या होतात.
(हेही वाचा – ९९ हजार पात्र फेरीवाले असतांना मतदारयादीत २२ हजारच कसे; Bombay High Courtची विचारणा)
मराठी-कानडी वाद (Marathi-Kannadi controversy) निर्माण झाल्याने महाराष्ट्रातील खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी एक दिवसासाठी शनिवारी वाहतूक बंद केली होती. त्यानंतर रविवारपासून खासगी ट्रॅव्हल्सची वाहतूक सुरु झाली. परंतु एसटीच्या बस बंद असल्याने प्रवाशांची मागणी वाढली आहे. त्याचा फायदा घेत खासगी ट्रॅव्हल्स वाहतूकदारांनी तिकीट दरात मात्र वाढ केली आहे. यामुळे प्रवाशांना जादा पैसे मोजून प्रवास करावा लागत आहे. मुंबईतून दररोज सुमारे ५० ते ६० ट्रॅव्हल्स बेळगाव, निपाणीकरिता निघतात.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community