टाटा समाजविज्ञान संस्थेमध्ये (टिस) एमएच्या पहिल्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा रविवारी चेंबूरमधील रहात्या फ्लॅटमध्ये मृत्यू झाला. अनुराग जयस्वाल (२९) असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. मूळचा उत्तर प्रदेशमधील लखनौचा असलेला अनुराग मित्रांसोबत चेंबूर येथील नवजीवन अनुराग जयस्वाल सोसायटीत रहायचा. (Tata Institute of Social Sciences)
(हेही वाचा – Dharavi Redevelopment Project : प्रकल्पात अडथळे आणणाऱ्यांचाच धारावीकरांनी विरोध करायला हवा)
‘टिस’मधील १५० विद्यार्थी पार्टीसाठी वाशी येथे गेले होते. येथे अनुरागने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केले. या प्रकरणी चेंबूर पोलीस अधिक तपास करत आहेत. पार्टीनंतर रविवारी पहाटे तीनच्या सुमारास अनुराग घरी येऊन झोपी गेला. सकाळी मित्रांनी अनुरागला उठवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो न उठल्याने रुग्णालयात दाखल केले. तेथे डॉक्टरांनी अनुरागला मृत घोषित केले. अनुरागच्या कुटुंबियांनी मुंबईत धाव घेतली असून ते मुंबईत पोहचल्यानंतर मुलाचे शवविच्छेदन करण्याची विनंती पोलिसांना केली आहे.
अनुरागच्या मृतदेहाचे राजावाडी रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात येणार आहे. त्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दारूपार्टीदरम्यान रॅगिंग झाली का? पार्टीत नेमके काय झाले? याबाबत सर्वांकडे पोलिस चौकशी करणार आहेत. प्राथमिक तपासात अतिमद्यप्राशनामुळे मृत्यू झाल्याचा संशय पोलिसांना आहे. (Tata Institute of Social Sciences)
हेही पहा –