वाराणसीमधील (Varanasi) उदय प्रताप कॉलेजमध्ये (Uday Pratap College) विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने जमून बेकायदेशीर मशिदीच्या विरोधात आंदोलन केले. युपी कॉलेजच्या (UP College) जमिनीवर असलेल्या मशिदीवर वक्फ बोर्डाने (Waqf Board) दावा केला आहे. कॉलेजच्या (UP College) परिसरात विद्यार्थी एकत्र जमून मशिद हटवण्याची मागणी करत आहेत.
( हेही वाचा : बाबासाहेबांच्या संविधानामुळे कोणी मुख्यमंत्री तर कोणी उपमुख्यमंत्री : Eknath Shinde)
युपी कॉलेजच्या (UP College) परिसरात दि. ६ डिसेंबर रोजी हजारो विद्यार्थी भगवे झेंडे घेऊन आंदोलन करत होते. त्यांनी मागणी केली की, नमाज अदा करायला येणाऱ्यांना रोखले जावे. तसेच जर त्यांनी नमाज अदा केली तर आम्ही हनुमान चालिसा पठण करू. यातील काही विद्यार्थी म्हणाले की, मशिद कमिटीजवळ युपी कॉलेजच्या (UP College) जमिनीवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क नाही. तरी सुद्धा ते नमाज अदा करण्यासाठी कॉलेज परिसरात येतात. त्यातच कॉलेज परिसरात असणारे बॅरिगेट ही विद्यार्थ्यांनी तोडले आहेत. (UP College)
दरम्यान याआधी दि. ३ डिसेंबर रोजी युपी कॉलेजच्या (UP College) बाहेर विद्यार्थ्यांनी हनुमान चालिसा पठण केले. त्यावेळी पोलिस आणि विद्यार्थी यांच्या झटापट झाली. अनेक विद्यार्थ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. त्यातच पोलिसांनी मशिदीबाबत वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी मुख्तार अहमद, गुलाम रसूलसह १२ जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. (UP College)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community