टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस प्रशासनाने इशारा दिल्यानंतरही मुंबईमधील विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आधारित ‘बीबीसी’च्या वादग्रस्त डॉक्युमेंट्रीचे स्क्रीनिंग केले. विद्यार्थ्यांच्या एका गटाने बीबीसीची वादग्रस्त डॉक्युमेंट्री दाखवण्या संदर्भातील नियोजन केल्याची बातमी समोर आल्यानंतर मुंबईमधील ‘टाटा इंस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्सेस’च्या प्रशासनाने विद्यार्थ्यांसाठी एक सूचना पत्रक जारी केले होते. संस्थेच्या कॅम्पसमध्ये अशाप्रकारच्या कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन करु नये असा इशारा प्रशासनाने दिला होता. या सूचनेकडे दुर्लक्ष करुन कार्यक्रमाचे आयोजन केल्यास नियमांनुसार कठोर कारवाई केली जाईल असे या पत्रकात म्हटले होते, असे असतानाही 200 विद्यार्थ्यांनी एकत्र बसून लॅपटॉपवर ही डॉक्युमेंट्री पाहिली.
भाजपचे आंदोलन
आमच्या असे लक्षात आले आहे की काही विद्यार्थी, सरकारने निर्बंध घातलेल्या बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंगसंदर्भात आदेशाचे उल्लंघन करणाच्या हालचाली करत आहेत. हे विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना एकत्र आणत आहेत, असे निदर्शनास आले आहे, असा उल्लेख या पत्रकात आहे. अशाप्रकारच्या कोणत्याही स्क्रीनिंगला परवानगी देण्यात आलेली नाही ज्यामुळे संस्थेमधील वातावरणावर परिणाम होईल, असेही या पत्रकात म्हटले.
(हेही वाचा मिराज, सुखोई लढाऊ विमाने एकमेकांना धडकली; अपघात होण्यामागे काय आहेत कारणे?)
भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न संस्था असलेल्या भारतीय विद्यार्थी परिषदेबरोबरच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाने या स्क्रीनिंगच्या विरोधात संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ आंदोलन केले. भाजपाच्या मुंबई विभागाचे प्रमुख आशीष शेलार यांनी ट्वीटरवरुन, पोलिसांनी तातडीने यावर बंदी घालायला हवी होती. नाहीतर आम्ही योग्य ती भूमिका घेऊ, असा इशारा दिला. या डॉक्युमेंट्रीच्या स्क्रीनिंग होणार नाही असे आश्वासन पोलिसांनी दिल्यानंतर भाजपाने हे आंदोलन मागे घेतले.
Join Our WhatsApp Community