पंतप्रधानांच्या ‘परीक्षा पे चर्चा’चा कार्यक्रम अनुभवला महापालिका शाळांच्या विद्यार्थ्यांनी

73

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवरून ‘परीक्षा पे चर्चा’ अंतर्गत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची दिलखुलास गप्पा मारत उत्तरेही दिली. या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण मुंबई महानगरपालिकेच्या वरळी सी-लिंक येथील शाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात आले. विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. शॉर्ट कट, कॉपीपासून त्यांनी दूर रहावे. चांगल्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी. अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करून जो विषय कठीण वाटतो त्याचा अधिक सराव करावा,असा कानमंत्रही विद्यार्थ्यांना दिला.

भारताने जागतिक स्तरावर नाव कोरणारे अनेक विद्यार्थी घडवले आहेत. आपल्या भारत देशाला जर प्रगतिपथावर आरूढ करायचे असेल तर विद्यार्थ्यांनी वैश्विक संधींचा विचार करावा, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. विद्यार्थी दशेत असताना परीक्षेसंदर्भात उद्भवणारे विविध प्रश्न विद्यार्थ्यांनी मा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना विचारले, त्यावर त्यांनी उदाहरणांसह प्रश्नांची उत्तरे दिली

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, विद्यार्थ्यांनी मन लावून अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. शॉर्ट कट, कॉपीपासून त्यांनी दूर रहावे. चांगल्या गुणांसाठी विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत घ्यावी. अभ्यासासाठी वेळेचे नियोजन करून जो विषय कठीण वाटतो त्याचा अधिक सराव करावा, असा कानमंत्र नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थ्यांना दिला.

महानगरपालिकेच्या वरळी सी-लिंक येथील शाळेत दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित केलेल्या थेट कार्यक्रमामध्ये शिक्षणाधिकारी राजू तडवी, उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुजाता खरे, अधीक्षक (शाळा) (शहर) सीमा चतुर्वेदी, प्रशासकीय अधिकारी वर्षा गांगुर्डे विभाग निरीक्षक रुता वानखेडे विभाग, प्राचार्य (कला अकादमी) दिनकर पवार आणि सोबत शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.