महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. २०१२ पासून सुरू असलेली बहुपर्यायी परीक्षा पद्धत बंद करून यंदापासून वर्णनात्मक पद्धतीने परीक्षा घेण्यात येणार आहे. या निर्णयाविरोधात स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी सूर्यकांत रोकडे आणि प्रवीण पाटील यांनी पत्रकार परिषदेत आपली नाराजी व्यक्त केली.
२०११ पूर्वीची ही परीक्षेतील वर्णनात्मक पद्धत अनेक कारणांमुळे बंद करण्यात आली होती. ही पद्धत वेळखाऊ होती, गुणदान व्यक्तीनिष्ठ होते आणि विशिष्ट वैकल्पिक विषयांच्या विद्यार्थ्यांनाच वर्ग-१ च्या पदांवर नियुक्त्या मिळत होत्या. विद्यार्थ्यांचा मुख्य आक्षेप आहे की, युपीएससीच्या ( (MPSC) अंधानुकरणातून एमपीएससीचा अभ्यासक्रम अवाजवी वाढवला जात आहे. संपूर्ण देशात कोणत्याही राज्यात ९०० गुणांपेक्षा जास्त गुणांची राज्य लोकसेवा परीक्षा नाही, मात्र महाराष्ट्रात २०२५ गुणांची परीक्षा घेतली जात आहे. नायब तहसीलदार पदासाठी जिल्हाधिकारी पदापेक्षाही जास्त अभ्यासक्रम लादला जात आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या बदलामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी आणि मुलींच्या संधी मर्यादित होण्याची भीती आहे.
Join Our WhatsApp Community