नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार पीएम ई-विद्या वाहिनी सुरू करण्यात आली आहे. त्यात महाराष्ट्रासाठी पाच डीटीएच टीव्ही वाहिनी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्यासाठी ई साहित्य निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या वाहिनीवर येत्या ऑगस्टपासून पहिली ते बारावी अभ्यासक्रम उपलब्ध होणार आहे. (PM E-Vidya)
प्रत्येक विद्यार्थ्याला कधीही व कुठेही दर्जेदार शैक्षणिक साहित्य उपलब्ध व्हावे, यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात डिजिटल शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. भारत जागतिक महासत्ता व ज्ञान महासत्ता बनविण्याच्या हेतूने गुणवत्तापूर्ण शिक्षणाला महत्त्व देण्यात आले आहे. त्यासाठी पंतप्रधान ई-विद्या योजना राबविण्यात येत आहे. (PM E-Vidya)
(हेही वाचा – “शरद पवारांनी काँग्रेससमोर अट ठेवली होती की, सुप्रिया सुळेंना…” विलिनीकरणाच्या विधानावर Sanjay Nirupam यांचा गौप्यस्फोट)
‘एक वर्ग एक वाहिनी’ म्हणून घोषित
त्यानुसार शिक्षणात तंत्रज्ञानाची भूमिका सक्षम करण्यासाठी पंतप्रधान ई-विद्या (PM E-Vidya) वाहिनी सुरू करण्यात आली आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रेडिओ तंत्रज्ञानासह डिजिटल ऑनलाइन शैक्षणिक साधने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (PM E-Vidya)
या वाहिनीला एक वर्ग एक वाहिनी म्हणून घोषित केले आहे. या योजनेतून १२ डीटीएच टीव्ही वाहिन्या सुरू करण्यात आल्या आहेत. दर्जेदार शैक्षणिक ई सामग्री उपलब्ध करून देणे हा यामागचा हेतू आहे. सध्या देशभरात एनसीईआरटीच्या माध्यमातून २०० डीटीएट टीव्ही वाहिन्यांद्वारे पहिली ते बारावीच्या विद्यार्थ्यांना प्रादेशिक भाषांमधून शिक्षण देण्यात येत आहे. यात महाराष्ट्रासाठी पाच वाहिन्या सुरू केल्या आहेत. (PM E-Vidya)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community