Financial Audit Report : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

Financial Audit Report : राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार करता पिकांच्या विभागात 1.5 टक्के घट होऊ शकते. वनसंवर्धनात 9.2 टक्के, मासेमारी व जल संवर्धनात 2.9 टक्के वाढ अपेक्षित आहे.

65
Financial Audit Report : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज
Financial Audit Report : राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढण्याचा अंदाज

महाराष्ट्र विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला गुरुवार, २७ जूनपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी 2023-24 चा महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेवला. महाराष्ट्राची अर्थव्यवस्था 7.6 टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच राज्याच्या कृषी आणि कृषीपुरक क्षेत्रातही 1.9 टक्क्यांची वाढ अपेक्षित असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. (financial audit report)

(हेही वाचा – “… त्यामुळे पुढील चर्चा आम्ही लिफ्टमध्ये करू”, लिफ्टमधल्या भेटीवर Uddhav Thackeray यांच सूचक वक्तव्य!)

राज्याच्या कृषी आणि संलग्न क्षेत्राचा एकंदरीत विचार करता पिकांच्या विभागात 1.5 टक्के घट होऊ शकते. वनसंवर्धनात 9.2 टक्के, मासेमारी व जल संवर्धनात 2.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. उद्योग क्षेत्रात 7.6 टक्के, वस्तू निर्मिती क्षेत्रात 7.5 टक्के, बांधकामात 6.2 टक्के, राज्याच्या व्यापार, दुरुस्ती, हॉटेल्स व उपहारगृहे, वाहतूक, साठवण व दळणवळण, तसेच प्रसारणाशी संबंधित सेवा क्षेत्रांत 6.6 टक्के, वित्तीय, स्थावर मालमत्ता व व्यावसायिक सेवांमध्ये 10.1 टक्के वाढ अपेक्षित आहे, सार्वजनिक प्रशासन, सुरक्षा व इतर सेवांमध्ये 7.6 टक्के, तर सेवा क्षेत्रात 8.8 टक्के वाढ अपेक्षित आहे.

आर्थिक विकासात कोणत्या क्षेत्राचा मोठा वाटा ?

2023-24 या आर्थिक वर्षात राज्याच्या आर्थिक विकासात सेवा क्षेत्राचा सर्वांत मोठा (63.8 टक्के) वाटा असून त्या खालोखाल उद्योग (25 टक्के) क्षेत्राचा नंबर लागतो. कृषी आणि संलग्न कार्यांमध्ये 11.2 टक्के वाढीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. गेल्या दशकभराचा विचार करता राज्याच्या विकासात सेवा क्षेत्राचा सरासरी 57.1 टक्के हिस्सा असून त्याखाली उद्योग (30.9 टक्के) क्षेत्राचा नंबर लागतो. कृषी आणि इतर संलग्न क्षेत्रांची 12 टक्के हिस्सेदारी आहे.

2023-24 चे राज्याचे उत्पन्न 40.44 लाख कोटी रुपये असून त्यामध्ये आर्थिक वर्ष 2022-23 च्या तुलनेत 10.9 टक्के वाढ अपेक्षित आहे. देशांतर्गत उत्पन्न 293.90 लाख कोटी रुपये असून त्यात 2022-23 च्या तुलनेत 9.1 टक्के वाढ अपेक्षित आहे. 2023-24 मध्ये राज्याचे दरडोई उत्पन्न 2,77,603 रुपये एवढे अपेक्षित असून 2022-23 मध्ये ते 2,52,389 रुपये एवढे होते. (financial audit report)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.