Subramanian Swamy: रामसेतूला राष्ट्रीय वारसा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांची ‘X’ वर माहिती

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एका मुलाखतीत बोलताना यासंदर्भात भाष्य केले होते.

159
Subramanian Swamy: रामसेतूला राष्ट्रीय वारसा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांची 'X' वर माहिती
Subramanian Swamy: रामसेतूला राष्ट्रीय वारसा मिळावा म्हणून सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार, भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांची 'X' वर माहिती

अयोध्येत रामललांची मूर्ती राम मंदिरात विराजमान झाली. अलौकिक आणि भव्यदिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राम मंदिर दर्शनार्थींसाठी खुले झाले आहे. पहिल्याच दिवशी ५ लाख भाविकांनी दर्शन घेतले. यातूनच ज्ञानवापी आणि श्रीकृष्ण जन्मभूमीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चिला जात असून राम मंदिराचे स्वप्न साकार झाले, आता पंतप्रधानांनी रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून घोषित करावे, अशी मागणी करण्यात येत आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे भाजपा नेत्याने स्पष्टपणे सांगितले.

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी ‘X’वर यासंदर्भात माहिती दिली. ज्ञानवापी काशी विश्वनाथ मंदिर आणि कृष्णजन्मभूमी मथुरा मंदिराची पुनर्स्थापना करण्याची परवानगी मिळावी, यासाठी आता सर्वोच्च न्यायालयात माझ्या प्रलंबित प्रार्थनास्थळांची जनहित याचिका तातडीने सूचिबद्ध करण्याची विनंती करणार आहे, असे सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटले आहे तसेच मोदी काही करत नाहीत, पण श्रेय घ्यायला येतात, असा टोलाही स्वामी यांनी लगावला.

दरम्यान, आता अयोध्येतील राम मंदिर साकार झाले आहे. एक स्वप्न साकार झाले आहे. पंतप्रधान मोदी यांनी आता रामसेतूला राष्ट्रीय वारसा म्हणून मान्यता द्यावी. यासाठी, सांस्कृतिक मंत्री प्रल्हाद पटेल यांच्या ६ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या फाइलवर स्वाक्षरी करावी, अशी मागणी सुब्रमण्यम स्वामी यांनी केली.

(हेही वाचा – Mamata Banerjee : ‘हिंदुस्तान पोस्ट’ची बातमी खरी ठरली; इंडि आघाडीमध्ये सर्वांत मोठी फूट )

प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील, न्यायही मिळेल
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही एका मुलाखतीत बोलताना यासंदर्भात भाष्य केले होते. अयोध्येनंतर आता काशी आणि मथुरा या ठिकाणी भाजपा आपले वचन पूर्ण करणार का, असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना करण्यात आला होता. यावर बोलताना योगी आदित्यनाथ यांनी सविस्तर उत्तर दिले. हा विषय न्यायप्रविष्ट आहे. राम मंदिरासाठी ५०० वर्षे संघर्ष केला आहे. संयमित पद्धतीने आम्ही न्यायालयीन लढाई लढून विजय मिळवला आणि त्यानंतरच आता रामलला प्राणप्रतिष्ठा केली. न्यायालयाच्या माध्यमातून अन्य ठिकाणचे मुद्देही सोडवले जातील. प्रभू श्रीकृष्णांची इच्छा असेल, तेव्हा तारखाही येतील आणि न्यायही मिळेल, असे योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.