भारताने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान पाठवून जागतिक विक्रम केला केला आहे. या यशानंतर इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ हे रविवार, २७ ऑगस्ट रोजी तिरुवनंतरपुरम येथील भद्रकाली मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घेतले, त्यावेळी सोमनाथ म्हणाले, दर्शनानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सोमनाथ यांनी मी एक संशोधक आहे. मी चंद्राचा अभ्यास करत आहे. विज्ञान आणि आध्यात्मिकता दोघांचा शोध घेणे हा माझ्या जीवनाच्या प्रवासाचा एक भाग आहे, असे म्हणाले.
मी अनेक मंदिरात जातो. तसेच अनेक धर्मग्रंथांचं वाचन केले आहे. त्यामुळेच मी आपल्या अस्तित्वाचा शोध घेण्यासाठी संशोधन करत असतो. हा एक प्रवास आहे, असे त्यांनी सांगितले. इस्त्रोच्या प्रमुखांनी पुढे सांगितले की, येणाऱ्या काही दिवसांमध्ये ३ सप्टेंबरपर्यंत आम्ही बरेचसे प्रयोग पूर्ण करण्याच्या स्थितीत असू, अशी मला अपेक्षा आहे, असेही सोमनाथ म्हणाले. आता आम्ही चंद्रयानाच्या वेगवेगळ्या पद्धतीने चाचण्या घेणार आहोत. त्यानंतर चंद्रावर नेमकी स्थिती कशी आहे, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे. Chandrayaan – 3 जिथे उतरले त्या ठिकाणाला शिवशक्ती असे नाव देण्याच्या निर्णयायाबबत विचारले असता सोमनाथ यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे नामकरण केले आहे. त्याचे अनेक अर्थ आहेत. तसेच ते आमच्यासाठी उपयुक्त आहे. त्यामध्ये काहीच चुकीचे नाही आहे. पंतप्रधानांनी पुढचे नावही सूचवले आहे. ते तिरंगा आहे. दोन्ही भारतीय वाटणारी नावे आहेत. आपण जे करतो, त्याचे एक महत्त्व असते. तसेच देशाचे पंतप्रधान असल्याने नामकरण करणे हा त्यांचा विशेषाधिकार आहे, असेही इस्त्रोच्या प्रमुखांनी सांगितले.
(हेही वाचा Chandrayaan – 3 : विक्रम लँडरने पाठवले पहिले निरीक्षण, चंद्रावरील तापमान कळवले
Join Our WhatsApp Community