-
प्रतिनिधी
सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी आवश्यक सर्व सुविधा तातडीने उपलब्ध करून देण्याचे निर्देश वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिले आहेत. तसेच या महाविद्यालयातून गोवा येथे रुग्ण पाठवण्याची पद्धत तात्काळ बंद करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांच्या पाठपुराव्यामुळे मंत्रालयात आयोजित बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीस मंत्री हसन मुश्रीफ, आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, वैद्यकीय शिक्षण आयुक्त राजीव निवतकर आणि अन्य अधिकारी उपस्थित होते.
(हेही वाचा – UPI User: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, १ तारखेपासून होणार ‘हे’ बदल, जाणून घ्या)
बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले, त्यानुसार –
- प्राध्यापकांची रिक्त पदे सहा महिन्यांत भरली जातील.
- वर्ग तीन आणि वर्ग चार पदे तसेच तांत्रिक-अतांत्रिक पदे आठ महिन्यांत भरली जातील.
- नव्याने उभारण्यात येणाऱ्या इमारतींची कामे तातडीने पूर्ण करावीत.
- नर्सिंग महाविद्यालयासाठी तात्पुरती निवासव्यवस्था करण्यात यावी.
- शासकीय महाविद्यालयासाठी 13 एकर अतिरिक्त जागा उपलब्ध करण्यासाठी मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.
(हेही वाचा – Election Commission : कोण होणार मुख्य निवडणूक आयुक्त?)
मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी महाविद्यालयात दर्जेदार उपचार सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी आवश्यक सुविधा आणि औषधांसाठी निधी देण्याची मागणी केली.
आयुक्त राजीव निवतकर यांनी सांगितले की, प्राध्यापक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, मे महिन्यापर्यंत ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल. (Nitesh Rane)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community