हात आणि बोटे गमावणा-या तरुणाचे यशस्वी अवयव प्रत्यारोपण! अशी पार पडली शस्त्रक्रिया

ही किमया परळच्या ग्लोबल रुग्णालयात घडली.

167

वडिलांच्या निवृत्तीनंतर घराची आर्थिक जबाबदारी सांभाळणा-या तरुणाला गेल्या वर्षी कंपनीत मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले. टायर बनवण्याच्या कंपनीत काम करताना दोन्ही हात मशीनमध्ये गेल्याने २० वर्षाच्या तरुणाचा डावा हात गळून पडला, तर उजव्या हाताची तीन बोटे निखळली.

रोजच्या दैनंदिन जीवनात कायमचे अपंगत्व आल्यानंतर कुटुंबीयांचा आर्थिक आधार गेला. या तरुणाला गुरुवारी हात प्रत्यारोपण शस्त्रक्रियेच्या माध्यमातून डाव्या भागावर नवा हात, तर उजव्या हातावर तीन नवी बोटे बसवण्यात आली. गमावलेली तीन बोटे प्रत्यारोपणाच्या माध्यमातून मिळवण्याच्या देशातील पहिल्या शस्त्रक्रियेची नोंद मुंबईत झाली.
ही किमया परळच्या ग्लोबल रुग्णालयात घडली.

(हेही वाचाः चिंता वाढली! शुक्रवारीही ओमायक्रॉनचे रुग्णांची नोंद, बघा आजची आकडेवारी)

अशी झाली शस्त्रक्रिया

गुरुवारी दैनंदिन कामकाजात मुंबई व्यस्त असताना या भांडुपच्या तरुणाला मृत रुग्णाकडून मिळालेले हात थेट अहमदाबादमधून मिळाले. कोरोना काळात विमानांचे वेळापत्रक बिघडलेले असताना, थेट चार्टर विमानाच्या मदतीने ग्लोबल रुग्णालयातील डॉक्टरांच्या टीमने रुग्णाच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी हात आणले. तेरा तासांच्या शस्त्रक्रियेनंतर अखेर तरुण रुग्णाला नवा डावा हात आणि उजव्या हातावर नवी तीन बोटे बसवली गेली.

अवयव दानातून साधली किमया

रुग्ण जवळपास दहा महिने एका हाताशिवाय आणि उजव्या हातावरील तीन बोटांशिवाय जगत होता. त्यामुळे दैनंदिन जीवनात त्याला वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते. दोन महिन्यांपूर्वी हाताच्या प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी तरुणाने प्रतीक्षा यादीत रुग्णालयात नाव नोंदवले. गुरुवारी अहमदाबादमधील २८ वर्षीय तरुणाने दुचाकी अपघातात जीव गमावल्यानंतर कुटुंबीयांनी हाताच्या प्रत्यारोपणासाठी आपल्या तरुण मुलाच्या मृतदेहाचे दोन हात दान केले.

(हेही वाचाः औरंगाबादेतल्या शेतक-याला मोदींनी पाठवले 15 लाख! तुमचं अकाऊंट तपासा)

हाताच्या प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षेत असलेल्या तरुण रुग्णाच्या डाव्या बाजूला गंभीर दुखापती होत्या. उजव्या हाताचा अंगठा आणि करंगळी हीच बोटे उरली होती. उरलेली तीन बोटे प्रत्यारोपणाच्या माध्यमातून पुन्हा हातावर बसवणे आव्हानात्मक होते.

 

-डॉ. निलेश सातभाई, प्लास्टिक सर्जन, ग्लोबल रुग्णालय, परळ

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.