अचानक आलेल्या मुसळधार पावसाने मुंबईकरांचा गोंधळ

160

शुक्रवारी, 7 आॅक्टोबर रोजी मुंबई व उपनगर परिसरात वेधशाळेच्या अंदाजाला चकवा देत वरुणराजाने चांगलेच मुंबईकरांना झोडपले. कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासून बरसणा-या पावसाने दुपारी बारानंतर मुंबईतही चांगलाच जोर धरला. मुंबईत अचानक सुरु झालेल्या पावसाने वाहतूक कोंडीची समस्या दिसून आली. मुंबईत दिवसभरात बहुतांश ठिकाणी ४० ते ७० मिमी पाऊस झाला, तर पालिका मुख्य कार्यालयाजवळील भागांत ९३.९९ मिमी पाऊस झाला. तर डोंबिवलीत पावसाने नवा विक्रमच नोंदवला. डोंबिवली पश्चिमेला ११२.५ मिमी, पूर्वेला १३५.८ मिमी तर विठ्ठलवाडीत १०८ मिमी पाऊस झाला.

दुपारी बारा वाजल्यापासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला

शुक्रवारी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा पूर्वानुमान मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिला होता. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दुपारी दिलेल्या नव्या अंदाजात पावसाचा जोर वाढत असल्याचे जाहीर केले. दुपारी बारा वाजल्यापासूनच मुंबईत पावसाचा जोर वाढला. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी टर्मिनस, गिरगाव, ग्रांट रोड तर पश्चिम उपनगरांत वर्सोवा येथे पावसाने धम्मालच उडवून दिली. ठाण्यात चिरागनगर, नौपाड्यातही पावसाचा मारा सुरु होता. शुक्रवारी दिवसभरात चिरागनगर येथे ९८.५ मिमी पाऊस झाला. नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली परिसरात त्या तुलनेत पाऊस जास्तच दिसून आला. सायंकाळी आठनंतर मुंबई व उपनगर परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याचे दिसून आले. मुंबई प्रादेशिक हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, शनिवारी मुंबईसह उत्तर कोकणात हलक्या पावसाची शक्यता आहे. तर वा-यांचा वेग ३० ते ४० किलोमीटर ताशी वेगाने वाहणार असल्याची शक्यता आहे.

(हेही वाचा समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान कार्यालयाकडून मिळाली तारीख)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.