सुप्रसिद्ध लेखिका आणि पद्मभूषण सुधा मूर्ती (sudha murthy) यांचे लिखाणे अबालवृद्धांसाठी नेहमीच प्रेरणास्रोत ठरते. आपल्या लिखाणाने इतरांना कायम प्रेरणा देणाऱ्या सुधा मूर्ती यांच्या अॅनिमेटेड सिरीज ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’चा (Story Time with Sudha Amma ) लॉंचिंग सोहळा नुकताच संपन्न झाला.
शिक्षणासोबत मुलांची करमणूकही व्हावी, हा मूर्ती मिडियाचा प्रयत्न आहे. सुधा मूर्ती यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या बऱ्याच गोष्टी प्रसिद्ध आहेत. या गोष्टी अॅनिमेटेड सिरीजच्या रुपात लहान मुलांना ‘स्टोरी टाईम विथ सुधा अम्मा’ या युट्यूब चॅनलवर पाहता येतील. सिरीजमध्ये आजी तिच्या नातवंडांना गोष्टी सांगताना दिसणार आहे. आजीचे पात्र सुधा मूर्ती यांनी रंगवले असून या सिरीजची निर्मिती सुधा मूर्ती यांची सून अपर्णा कृष्णन यांनी केली आहे.
(हेही वाचा – Justin Trudeau: कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन ट्रुडो यांनी स्वस्तिक चिन्हाबाबत केले वादग्रस्त विधान)
या सिरीजसाठी तायर करण्यात आलेले गाणे हे प्रसून जोशी यांनी लिहिले असून शांतनू मोईत्रा यांनी या सिरिजला संगीत दिले आहे.
Join Our WhatsApp Community